ताज्या बातम्या

Camel Smuggling: चोपड्यात 85 उंट पोलिसांच्या ताब्यात; क्रूर, निर्दयी वागणूक देणाऱ्या 4 जणांना अटक

Camel Smuggling : तालुक्यातील शिरपूर – चोपडा रस्त्यावरील गलंगी गावाच्या हद्दीत पुरेसे अन्नपाणी न देता उंटांची अवैधरीत्या क्रूर व निर्दयीतेने गुजरातमधील भूज, कच्छ येथून जाणारा ८५ उंटांचा जत्था अडवून सर्व उंट ताब्यात घेत चोपडा ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी (ता. २८) सकाळी सहाला कारवाई केली. 

या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या उंटांची गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे. हे उंट १६ लाख ३१ हजारांचे असून, त्यांची तस्करी आहे की खरेदी विक्रीतून त्यांचे स्थलांतर केले जात होते, यासंदर्भात पोलिस तपास करीत आहेत. या उंटांसदर्भातील शहरात पहिल्यांदाच कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत रितेश रामकृष्ण माळी यांनी फिर्याद दिल्यानुसार ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गुरुवारी (ता. २८) सकाळी सहाच्या सुमारास चोपडा ते शिरपूर रस्त्यावरून जाताना गलंगी गावाच्या हद्दीत सोमाभाई मेधा रबारी (वय ५३, रा. लियारी, ता. अबडासा, जि. भूज, गुजरात), लाखाभाई देवाभाई रबारी (वय ५४, रा. बांड, ता. बुधरा, जि. भूज), वज्रभाई रबारी लालाभाई दबाय (वय ३७, रा. मोधारा, ता. हलिया, जि. भूज), बाधाभाई मेधाभाई रबारी (वय ४९, रा. लिधारी, ता. नलोया, जि. भूज) यांनी त्यांच्या मालकीचे ५ ते ९ वर्षे वयोगटाचे लहान, मोठे तपकिरी रंगाचे, कृच्ची जातीचे, आखूड शेपटीचे १६ लाख ३१ हजार रुपये किमतीचे एकूण ८५ उंट, पाना भूज, गुजरात येथून पायी चालवीत घेऊन येऊन त्यांचा छळ करीत त्यांना आराम न क्रूरतेने त्यांना पुरेसे अन्न, पाणी न देता त्यांना पायी चालवित घेऊन आले.

या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजू महाजन तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *