ताज्या बातम्या

‘धारावीच्या माध्यमातून मुंबई अदानीला दान’! षडयंत्राचा काँग्रेस आमदाराचा आरोप, विरोधकांचा प्रस्ताव सादर

धारावी झोडपट्टीच्या पुनर्वसनाचे कंत्राट देऊन अदानी यांना संपूर्ण मुंबईच दान देण्याचे षडयंत्र राज्य सरकारने रचले असल्याचा आरोप काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत केला.

धारावी झोडपट्टीच्या पुनर्वसनाचे कंत्राट देऊन अदानी यांना संपूर्ण मुंबईच दान देण्याचे षडयंत्र राज्य सरकारने रचले असल्याचा आरोप काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत केला.

विरोधकांच्यावतीने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर त्यांनी अदानी यांना धारवीच्या विकासासाठी देण्यात आलेल्या सोयी, सवलती, त्यामुळे कंपनीला होणारा फायदा याची आकडेवारीसह सविस्तर माहिती दिली. जी जमीन सरकारी ती अदानीची असाही आरोप त्यांनी केला.

हा अदानी विकास आहे की मुंबईची लूट असाही प्रश्न त्यांनी सरकारला केला. अदानींच्या कंपनीला धारावीतील १६० हेक्टेर क्षेत्राच्या विकासासाठी १०.६ एफएसआय देण्यात आला. तेवीसशे कोटींची ही निविदा असून एक लाख कोटीनी अदानीचा फायदा होणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

आमदार शेलारांचे प्रत्युत्तर
भाजपच्यावतीने आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर देताना ही सर्व प्रक्रिया उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळात झाल्याचे सांगितले. मुंबईचा विकास होऊ नये अशीच आणि जे काही होईल ते आपल्याच माध्यमातून व्हावे, अशीच भूमिका उबाठाची आहे. त्यामुळे प्रत्येक विकासाच्या प्रकल्पाला विरोध केला जात आहे.

मग तो धारावी असो की आरे कारशेड असो. महाविकास आघाडीच्या कार्यकाळतही ५०० चौरस फुटाचे घर झोडपट्टीधारकांना देण्याचा उल्लेख नव्हता. मात्र आता सत्ता नसल्याने महाविकास आघाडीचे नेते यास विरोध करीत असल्याचे आशिष शेलार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *