Gyanvapi Row: ज्ञानवापी प्रकरणात कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. पुरातत्व सर्वेक्षणाचा अहवाल दोन्ही बाजूंना उपलब्ध करून द्यावा, असा आदेश कोर्टाने दिला आहे. सर्वेक्षणाचा अभ्यास अहवाल सार्वजनिक करू नये, असा अर्ज मुस्लिम पक्षाने दिला होता. १८ डिसेंबर रोजी एएसआयने अभ्यास अहवाल न्यायालयात सादर केला आहे.
सर्वेक्षणाचा पाहणीचा अभ्यास अहवाल सीलबंद लिफाफ्यात सादर केला होता. एएसआयने चार भागात सर्वेक्षणाचा अभ्यास अहवाल न्यायालयात सादर केला होता. एएसआयच्या अभ्यास अहवालातून ज्ञानवापी मशिदीचे सत्य समोर येईल. एएसआयने बाथरूम वगळता संपूर्ण ज्ञानवापी कॉम्प्लेक्सचा सर्व्हे केला होता. ज्ञानवापी कॅम्पसमध्ये हे सर्वेक्षण १०० दिवसांपेक्षा जास्त काळ चालले.
ज्ञानवापी प्रकरणात आज २ वाजता न्यायालयात सुनावणी झाली. हिंदू पक्षाची बाजू मांडणारे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले, “आज कोर्टाने दोन्ही बाजू ऐकल्या आणि एएसआयच्या अहवालाची हार्ड कॉपी दोन्ही बाजूंना दिली जाईल यावर एकमत झाले.”
जिल्हा न्यायालयाच्या गेल्यावर्षी २१ जुलै च्या आदेशानंतर एएसआय ने काशी विश्वनाथ मंदिराच्या बाजुला असलेल्या ज्ञानवापी मशीद परिसरात वैज्ञानिक सर्वेक्षण केले होते. ही मशीद हिंदू मंदिराच्या पूर्वीच्या रचनेवर बांधली गेली होती की नाही, हे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.