ताज्या बातम्या

MLA Disqualification Case : ठाकरे गटानंतर आता शिंदे गटाच्या ‘या’ आमदारांची होणार उलट तपासणी

शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर विधानसभेत सुरू आहे. दरम्यान, या आमदार अपात्रतेप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांची लवकरच उलटतपासणी होणार आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या वतीने साक्ष, पुरावे आणि प्रतिज्ञापत्र विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाच्या सुमारे 5 आमदार आणि एका खासदाराची साक्ष नोंदवण्यात येणार आहे.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात दोन्ही गटांना त्यांचे साक्ष पुरावे आणि प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी १८ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र शिंदे गटाने हे पुरावे विधानसभा अध्यक्षांकडे सादर करण्यासाठी आणखी वेळ मागितला होता आणि त्यानंतर 24 नोव्हेंबर रोजी शिवसेना शिंदे गटाने साक्ष, पुरावे आणि शपथपत्र विधानसभा अध्यक्षांकडे सादर केले.

यामध्ये आमदार दीपक केसरकर, उदय सामंत, दिलीप लांडे, योगेश कदम, भरत गोगावले, खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष नोंदवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना शिंदे गटाचे पुरावे म्हणून भरत गोगावले यांची उलटतपासणी नोंदवली जाणार असून त्यात ठाकरे गटाचे वकील त्यांची उलटतपासणी करणार आहेत.

दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार आणि रेकॉर्डवरील माहितीनुसार शिंदे गटाच्या इतर पाच आमदार-खासदारांनाही ठाकरे गटाच्या वकिलांकडून विविध मुद्द्यांवर चौकशी व उपप्रश्न केले जाणार आहेत.

भरत गोगावले आणि मंत्री दीपक केसकर यांच्या अपात्रतेबाबत विधिमंडळात सुरू असलेल्या सुनावणीत शिंदे गटाकडून फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. शिवसेना उभा गटाचे आद्यप्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष ज्या पद्धतीने नोंदवली जाणार आहे. शिंदे गटाकडून उदय सामंत आणि दिलीप लांडे यांचीही साक्ष याच पद्धतीने नोंदवली जाणार आहे. अपात्रतेच्या सुनावणीचा आज पाचवा दिवस आहे. शिवसेना नेते सुनील प्रभू यांची आज साक्ष नोंदवली जाणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *