ताज्या बातम्या

Mumbai : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मंत्री छगन भजबळांना दिलासा

दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही याचिका मागे घेण्यात आली आहे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका मागे घेत असल्याचे ईडीने मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. परंतु छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळाविरोधातील खटला मात्र ईडीने मागे घेतलेला नाही.दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही याचिका मागे घेण्यात आली आहे.

न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या एकलपीठापुढे या प्रकरणी नुकतीच सुनावणी झाली. त्यावेळी, भुजबळ आणि समीर यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका मागे घेण्यात येत असल्याचे ईडीच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. तसेच, याचिका मागे घेण्यास परवानगी देण्याची मागणी केली. न्यायालयानेही ईडीची मागणी मान्य केली.

दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना ईडीने 2016 मध्ये अटक केली होती. त्यानंतर, 2 वर्षांनी या प्रकरणी उच्च न्यायालयाने भुजबळ यांना जामीन मंजूर केला होता.या निर्णयाला ईडीने 2018 मध्ये उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दुसरीकडे, विशेष न्यायालयानेही 16 ऑक्टोबर रोजी भुजबळ यांना पासपोर्ट नूतनीकरणाची परवानगी देत परदेशात जाण्याची अनुंमती दिली होती.

हे प्रकरण सप्टेंबर महिन्यात सुनावणीसाठी आले. त्यावेळी याचिका नेमकी कशासाठी केली होती हे आठवत नसल्याचे आणि याचिकेची प्रत सापडत नसल्याचे ईडीच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले होते. न्यायालयानेही ईडीच्या या दाव्याबाबत आश्चर्य व्यक्त करत याचिका नेमकी कशासाठी केली हे स्पष्ट करण्यासाठी न्यायालयाने ईडीला वेळ दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *