गेल्या अनेक दिवसांपासून देशात ट्रेनमध्ये आगीच्या घटना घडत आहेत. नांदेडमध्ये पॅसेंजर ट्रेनला लागलेली आग सध्या आटोक्यात आणण्यात आली आहे. मात्र ही आग का लागली?, याची चौकशी सुरु आहे.
Purna-Parli Passenger Train: महाराष्ट्रातील नांदेडजवळ आज पूर्णा-परळी पॅसेंजर ट्रेनला भीषण आग लागली आहे. आग कशी लागली याची चौकशी सुरू आहे. आग लागल्यानंतर ट्रेन थांबवून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलासह आजूबाजूच्या लोकांनीही आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
गेल्या अनेक दिवसांपासून देशात ट्रेनमध्ये आगीच्या घटना घडत आहेत. नांदेडमध्ये पॅसेंजर ट्रेनला लागलेली आग सध्या आटोक्यात आणण्यात आली आहे. मात्र ही आग का लागली?, याची चौकशी सुरु आहे. दरम्यान या घटनेबाबत दक्षिण मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. नांदेड मेंटेनन्स यार्डमध्ये उभ्या असलेल्या एका डब्यात (luggage-cum-guar van coach) आज आग लागली.
घटनेनंतर 30 मिनिटांत आग पूर्णपणे आटोक्यात आली आणि इतर कोणत्याही डब्याचे नुकसान झाले नाही, असे दक्षिण मध्य रेल्वेने स्पष्ट केले.