Ram Temple Ayodhya Security: 22 जानेवारीला होणारा अभिषेक सोहळा होणार आहे. तर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन लक्षात घेऊन उत्तर प्रदेशात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. अयोध्येला छावणीचं स्वरुप प्राप्त झाले आहे. चौका-चौकात कमांडो तैनात करण्यात आले आहेत. अयोध्येतील लता मंगेशकर चौकात उत्तर प्रदेशचे दहशतवादविरोधी पथक (एटीएस) कमांडो तैनात करण्यात आले आहेत.
सुरक्षेत कुठलीही कुचराई होऊ नये यासाठी पोलिसांचा सर्वत्र बंदोबस्त असून एटीएस कमांडोही तैनात करण्यात आले आहेत. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी तयारी पूर्ण झाली आहे. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी अयोध्येला सशक्त सुरक्षा कठडे लावण्यात येणार आहेत.
उत्तर प्रदेश पोलिसांनी 360-डिग्री सुरक्षा कव्हरेज प्रदान करण्यासाठी अँटी-माइन ड्रोन देखील तैनात केले आहेत. मात्र, ATS कमांडोंची सर्वाधिक चर्चा होत आहे. उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील दहशतवादी कारवायांचा सामना करण्यासाठी 2007 मध्ये दहशतवादविरोधी पथकाची स्थापना केली होती. उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक 2007 पासून कार्यरत आहे ते उत्तर प्रदेश पोलिसांचे विशेष युनिट म्हणून काम करते.
एटीएसचे मुख्यालय राजधानी लखनौ येथे आहे. राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फील्ड युनिट्स देखील तयार करण्यात आल्या आहेत, जिथे ऑपरेशनल एटीएस कमांडोजच्या अनेक तुकड्या आहेत. ऑपरेशन टीम्स आणि फील्ड युनिट्सना अचूक आणि आवश्यक सहाय्य देण्यासाठी इतर विशेष युनिट्स ATS मुख्यालयात कार्यरत आहेत.
ज्या ठिकाणी दहशतवादी कारवायांच्या अफवा आहेत त्या ठिकाणी एटीएस सहसा तैनात असते. याशिवाय व्हीव्हीआयपी लोक जिथे जमतील तिथे त्यांच्या सुरक्षेसाठी एटीएस कमांडो तैनात असतात. उत्तर प्रदेशात माफियांवर कारवाई करण्यासाठी ATS कमांडोही अनेकदा तैनात करण्यात आले आहेत.