Sachin Tendulkar Deepfake Video Controversy : भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने सोमवारी त्याच्या X अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर चांगलाच संतापलेला दिसत आहे.
वास्तविक, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा हा राग त्याच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ गेमिंग अॅपद्वारे वापरण्यात आल्यानंतर दिसून आला. गेमिंग अॅपद्वारे सचिनचा व्हिडिओ खोटी जाहिरात म्हणून वापरण्यात आला आणि या व्हिडिओमध्ये सचिनचा आवाज म्यूट करण्यात आला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने याप्रकरणी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
डीपफेक व्हिडिओवर सचिन तेंडुलकरने संताप व्यक्त केल्यानंतर आता महाराष्ट्र त्यावर कारवाई करणार आहे. महाराष्ट्र सरकारचे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी हा व्हिडिओ समोर आणल्यानंतर सचिन तेंडुलकरचे आभार मानले. अशा डीपफेक आणि चुकीची माहिती देणारे व्हिडिओ भारतीय वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण करतात. या प्लॅटफॉर्मसाठी केंद्राने जारी केलेल्या सल्ल्याचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे कोणी केले नाही तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. आम्ही लवकरच या प्लॅटफॉर्मसाठी IT नियमांतर्गत कठोर नियमांची अधिसूचना जारी करू.