ताज्या बातम्या

संजय राऊत-रोहित पवारांनी उभा केलेला स्टंट.. मराठा आरक्षणाच्या विजयावर सदावर्तेंची टीका

मुंबई– सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. यासंदर्भात शिंदे सरकारडून अध्यादेश जाहीर करण्यात आला आहे. यावरुन वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारच्या अध्यादेशाविरोधात लवकरत कोर्टात जाणार आहोत, अशी भूमिका सदावर्ते यांनी स्पष्ट केली.

माझे मराठे बांधव आता ईडब्यूएसपासून वंचित राहतील. त्यांना EWS पासून दूर ठेवण्याचे हे षडयंत्र आहे. सरकारचा अध्यादेश एक नोटीस आहे. मागास आयोगामध्ये काय सुरु आहे. अधिकाऱ्यांचे संरक्षण कसं केलं जात आहे. याबाबत लवकरच कोर्टाचे दार ठोठावणार आहोत, असं सदावर्ते म्हणाले.

रोहित पवार आझाद मैदानात गेले होते. संजय राऊत, निखील वागळे यांनी आपली जागा पाहावी. अशा चाटू लोकांनी माझ्यावर बोलण्याचा अधिकार नाही. माझ्या मराठा बांधवांनी आपली एनर्जी वाया घालू नये. कायदा वाचावं, कलमं पाहावी. वाचाल तर वाचाल. जरांगेंनी कोणता अभ्यास केलाय माहिती नाही. जरांगेंकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी टीका सदावर्ते यांनी केली.

हा एक राजकीय स्टंट आहे. संजय राऊत, रोहित पवार, निखील वागळे यांनी उभे केलेलं हे थोतांड आहे. कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेवर हे टिकणारं नाही. गुलाल उधळायचे काही कारण नाही. मराठा बांधव हे देखील माझे प्राण आहेत. त्यांनी आपली ताकद वाया घालवू नये, असं सदावर्ते म्हणाले.

मागच्या दाराने आरक्षण घेण्याची कोणतीही तरतूद नाही. मागासवर्गांचे रक्षण करणे हे माझं कर्तव्य आहे. छ. संभाजीनगर खंडपीठाने स्पष्टपणे आदेश दिले आहेत की, मराठवाड्यातील कुणबी हे मागास नाहीत. त्यामुळे कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. कोणीही अधिकारी कोर्टाचा निर्णय पाहिल आणि मगच प्रमाणपत्र देईल, असं ते म्हणाले.

जरांगे पाटील यांचं काय ज्ञान आहे माहिती नाही. कोणत्या कॉलेजमधून त्यांनी लॉ केलीये ते माहिती नाही. जरांगे पाटलांनी कोणत्या विषयात डॉक्टरेट केलीये. मराठा समाजात अनेक विद्वान लोक आहे. त्यांनी कोणी काही म्हटलं असतं तर मी विचार केला असता पण जरांगेंना महत्व देण्याचं कारण नाही. सोमवारची वाट पाहा, असं सदावर्ते म्हणाले.

मराठा बांधवांवर देखील अन्याय होऊ देणार नाही. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. कोणाच्याही जागा कमी होऊ देणार नाही. रक्ताच्या नात्याची व्याख्या कायद्यातच आहे. नवीन काहीच नाही. कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही. कायद्यापेक्षा सरकारची नोटीस मोठी आहे का? ते कोणीही टाळू शकत नाही, असं सदावर्ते म्हणाले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *