ताज्या बातम्या

Tanaji Sawant : राज्यात औषधांचा तुटवडा नसल्याचे आरोग्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

पुणे : 15 ऑगस्टपासून संपूर्ण राज्यात मोफत औषध आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परिणामी बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि आंतररुग्ण विभागातील (आयपीडी) रुग्णांची संख्या तिपटीने वाढली आहे.

त्यामुळे साहजिकच संबंधित केंद्रात महिनाभर टिकणारा औषधी व सलाईनचा साठा आठवडाभरातच संपू लागला. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हास्तरावर तातडीने औषध खरेदी करण्याचे आदेश दिले असून, प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यात औषधांचा किंवा सलाईनचा तुटवडा नाही, असे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले.

सावंत पुण्यातील एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. राज्यात औषधांचा तुटवडा असल्याचा कोणताही अहवाल मला मिळालेला नाही, असे ते म्हणाले. आरोग्य विभागातील संचालकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचेही सावंत यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “”आरोग्य विभागात संचालक पदाची जाहिरात तयार आहे.

2012 पासून आरोग्य विभागाची पॉइंट लिस्ट तयार नव्हती. बिंदूनामावली अद्ययावत करण्याची प्रक्रिया तीन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली असून ती लवकरच पूर्ण होईल. संचालकपदासाठी पदोन्नतीची प्रक्रिया सुरू आहे. येत्या काही दिवसांत ती पदे भरली जातील.

अंमली पदार्थ तस्कर प्रकरणी ललित पाटील, ससून रुग्णालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना दोषी ठरवून त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *