Mumbai High Court: सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी अलिबाग येथे जमीन बळकावल्याचा आरोप करत या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी करणाऱ्या भाजपच्या माजी खासदार किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले.
केवळ जमीन व्यवहारातील अनियमितता अधोरेखित करण्याच्या उद्देशापुरतीच आम्ही याचिकेवर सुनावणी घ्यायची का, असा सवाल मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठाने सोमय्या यांना विचारला.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रवींद्र वायकर यांनी अलिबागमध्ये बंगले बांधले असून सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले आहे तसेच ठाकरे व त्यांच्या कुुटुंबीयांनी ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून बनावट महसूल नोंदी केल्या व वनक्षेत्रात बंगले बांधले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी याचिकेद्वारे केला आहे.