धूम्रपान हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आपल्या शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होतो. आत्तापर्यंत आपल्या सर्वांना माहित आहे की धूम्रपानाचा फुफ्फुसांवर सर्वात जास्त परिणाम होतो. यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग देखील होतो, परंतु त्याचे तोटे फक्त एवढ्यापुरते मर्यादित नाहीत. धूम्रपानामुळे मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतो.
अभ्यासात आले समोर
खरं तर, अमेरिकेतील वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, धूम्रपानामुळे मेंदू संकुचित होतो. यामुळे तुमच्या मेंदूचा व्हॉल्यूम कमी होऊ शकतो. याचा मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे डिमेंशियाचा धोकाही वाढतो.
धूम्रपान करणारी व्यक्ती सामान्य व्यक्तीपेक्षा लवकर म्हातारी होते. सिगारेट सोडल्याने ब्रेन टिशुंना होणारे नुकसान टाळता येते, परंतु मेंदू एकदा संकुचित झाला की तो त्याच्या मूळ आकारात परत येऊ शकत नाही.
या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
कमी दिसणे
रस्ता लक्षात न राहणे
अल्झायमर रोग
डिमेंशिया
गोष्टी लक्षात ठेवण्यात अडचण, दिशाभूल
तणाव
गोंधळून जाणे
धूम्रपानामुळे मेंदूमध्ये बदल होऊ शकतात. यामुळे स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका, नियोजनात समस्या, चिंता करण्याची प्रवृत्ती आणि मानसिक समस्या वाढू शकतात. सेरेब्रल कॉर्टेक्स पातळ होणे, मेंदूचा आकार कमी होणे हे न्यूरोडीजनरेशनशी जोडले गेले आहेत. अल्झायमर आणि डिमेंशिया यासारख्या न्यूरोडीजनरेटिव्ह आजारांचा धोका वाढतो.