गर्भवती महिलांनी मक्याची भाकरी खावी की नाही?
Healthy Food :
हिवाळा म्हणजे कुडकुडणाऱ्या थंडीत गरमागरम जेवणाचा आस्वाद घेणे होय. हिवाळ्यात हुरडा, बाजरी, मका अशा पिकांची रेलचेल असते. गावभागात आजही शेतात हुरडा पार्टीचे आयोजन केले जाते. तर, पावट्याचं कालवणं अन् बाजरीची भाकरीही मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते.
मक्याची कणसं अन् त्यापासून बनवलेली भाकरी, पदार्थ वेगळीच चव देतात. हिवाळ्यात शरीराला उर्जा देणारे पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टरही देतात. त्यामुळे हिवाळ्यात मक्याची भाकरी खाण्याचे अनेक फायदे आहेत.
देशातील विविध भागात मक्याची भाकरी तर नेहमीच खाल्ली जाते. पंजाबसारख्या राज्यात तर मक्याची भाकरी आणि सरसो म्हणजेच, मोहरीच्या पानांची भाजी फेव्हरेट आहे.
ही भाकरी खायला जितकी स्वादिष्ट तितकेच शरीराला फायदेशीर ठरते. व्हिटॅमिन ए, बी, ई, तांबे, जस्त, पोटॅशियम यासह अनेक पोषक घटक मक्याच्या ब्रेडमध्ये आढळतात. या भाकरीमध्ये असे पोषक घटक आढळतात जे शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. चला जाणून घेऊया मक्याची भाकरी खाण्याचे फायदे.
मधुमेहामध्ये गुणकारी
मधुमेहाच्या रुग्णांसाठी चपाती, भाकरी खाणे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण करणारे ठरू शकते. त्यासाठी मक्याची भाकरी खूप फायदेशीर आहे. या भाकरीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते जे इंसुलिनचे संतुलन नियंत्रित करते. यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
बद्धकोष्ठतेपासून सुटका
मक्याच्या भाकरीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. जे पोटातील हानिकारक पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. याचे नियमित सेवन केल्यास अपचन, बद्धकोष्ठता, पोटदुखी यांसारखे पोटाशी संबंधित आजार बरे होतात.
शरीराला उष्णता देते
हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी उष्ण गुणधर्माच्या पदार्थांचे सेवन करावे. मका हा उष्ण असतो. त्याची भाकरी खाल्ल्याने शरीर उबदार राहते आणि हिवाळ्यात थंडीचा त्रास कमी होतो. हिवाळ्यातील अनेक आजारांपासूनही सुटका मिळते.
अशक्तपणा दूर करते
मक्याच्या भाकरीमध्ये पुरेशा प्रमाणात झिंक, लोह आणि बीटा कॅरोटीन असते जे शरीरातील अशक्तपणाची भरपाई करण्यास मदत करते. अॅनिमियाच्या रुग्णांनी नियमितपणे कॉर्न ब्रेडचे सेवन करावे.
गर्भवती महिलांनी मक्याची भाकरी खावी की नाही?
मका हा गर्भवती महिलांसाठी खूप उपयुक्त आहे. याचे सेवन केल्याने महिलांमध्ये फॉलिक अॅसिडची कमतरता भासत नाही. गर्भवती असलेल्या महिलांना फॉलिक अॅसिडच्या गोळ्याही खाव्या लागतात. पण या गोळ्यांऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्याने मक्याच्या पदार्थांचे सेवन केले तरी चालू शकते.
मका बाळासाठी आणि आईसाठी आरोग्यदायी आहे. त्याचे विविध पदार्थ तूम्ही खाऊ शकता. त्यामुळे गर्भवती महिलांच्या तोंडाला चवही येईल. आणि पोटही भरलेले राहील.