लाईफस्टाईल

Winter Drink: हिवाळ्यात सर्दी खोकल्यापासून दूर राहण्यासाठी हे पेय नक्की प्या; रेसिपी पाहा

हिवाळा सुरू झाला असून वातावरणात सतत बदल होताना दिसत आहेत. हिवाळ्यात अनेक आजार होतात. या काळात सतत आळशीपणा जाणवतो. शरीराची हालचाल करण्यासाठी अनेक लोक कंटाळा करतात. शारिरीक हालचाल न केल्याने पचन समस्या वाढत आहेत. तसेच या वातावरणाच सर्दी, खोकला, घसा खवखवणे असे अनेक आजार होतात.

सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे या समस्यांपासून काळजी घ्यायला हवी. यासाठी आहारात बदल करायला हवे. पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. या काळात आहारात सूंठ, अदरक समावेश करावा. अदरक, सूंठ या गोष्टी खाताना खूप जास्त कडू आणि तिखट लागते. त्यामुळे या गोष्टींचा एकत्रितपणे ज्युस प्यायल्याने खूप फायदा होईल.

रेसिपी (Recipe)

  • एका कढईत एक लिटर पाणी उकळण्यासाठी ठेवा.
  • त्यात अर्धा चमचा सुंठ पावडर टाका.
  • त्यानंतर वेलची घाला.
  • पाणी उकळून घ्या. पाणी अर्धे होईपर्यंत उकळून घ्या.
  • हे पाणी तुम्ही दिवसभर एका बाटलीत भरुन पिऊ शकता.

अदरकचे फायदे (Ginger benefits)

अदरक खालल्याने पचनाच्या समस्या दूर हेतात. हिवाळ्यात अदरक खालल्याने शरीर ऊबदार राहते. अदरकमध्ये विटामीन सी, फायबर आणि आयनसारखे पोषक तत्वे असतातय

अदरकमध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे सर्दी-खोकला यांसारखे आजार दूर राहतात. अदरकचे सेवन केल्याने सांधेदुखी, पाठदुखी आणि सूज येणे अशा समस्या दूर होतात.

वेलची

वेलची आरोग्यासाटी खूप फायदेशीर आहे. वेलचीमधील अँटीमायक्रोबियल, अँटीऑक्सिडंट आणि अँटी इंफ्लेमेंटरी गुणधर्म असतात. जे शरीरला अनेक आजारांपासून दूर ठेवतात. वेलची खालल्याने पोटदुखी, जळजळ या समस्या दूर होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *