लाईफस्टाईल

Wooden Furniture Care : घरातल्या लाकडी फर्निचरची अशी घ्या काळजी, वाळवीपासून राहिल दूर

घर सुंदर बनवण्यासाठी आपण नवीन प्रकारचे अनेक स्टायलिश गोष्टी आणतो. तसेच फर्निचर हे तुमचे घर अतिशय आकर्षक बनवण्याचे काम करते. बेडरूम असो, किचन असो किंवा लिव्हिंग एरिया फर्निचर हे तुमच्या घराचे सौंदर्य वाढवते.

फर्निचर ही रोज खरेदी करायची किंवा बदलायची गोष्ट नाही, त्यामुळे लोक अगदी महागडे फर्निचरही त्यांच्या आवडीनुसार विकत घेतात. अशा स्थितीत त्यांची अत्यंत काळजीपूर्वक देखभाल करणे आवश्यक आहे.

त्यांची योग्य काळजी न घेतल्यास हे फर्निचर लवकर खराब होऊ लागते. तुमचे फर्निचर वर्षानुवर्षे टिकून राहावे आणि ते लवकर खराब होणार नाही याची खात्री करण्यासाठी, त्याची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊयात.

रोज धूळ साफ करा

दररोज फर्निचरची धूळ साफ करा. वास्तविक, दररोज साफसफाई न केल्यामुळे धूळ आणि घाण साचते जी अतिशय वाईट असते. त्यामुळे दररोज साफसफाई खूप गरजेची आहे. धूळ साफ करण्यासाठी मऊ कपडा वापरा.

सूर्यप्रकाशात ठेवू नका

फर्निचर शक्यतो सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. घराच्या कोपऱ्यात जिथे सूर्यप्रकाश येत असेल तिथे फर्निचर ठेवू नका. सूर्यप्रकाशामुळे अनेक वेळा फर्निचर खराब होऊ शकते. वास्तविक, खिडक्या किंवा दारांतून येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे त्याच्या रंगावर परिणाम जास्त होताना दिसतो. लाकूडही आकुंचन पावू शकते. अशा स्थितीत, फर्निचर अशा ठिकाणी ठेवा जेथे कडक सूर्यप्रकाश पोहोचणार नाही.

कव्हर घाला

लाकडी फर्निचर जास्त काळ टिकवण्यासाठी, तुम्ही ते नेहमी कव्हर घालून ठेवले पाहिजे. कव्हर लावल्याने त्यावर लवकर डाग पडत नाहीत. तसेच कव्हरमुळे तुमच्या फर्निचरलाही नवा लुक मिळेल.

डाग असे काढा

फर्निचर स्वच्छ करण्यासाठी शॅम्पू आणि पाण्याने मिश्रण तयार करा. आता त्यात कपडा भिजवून फर्निचर स्वच्छ करा. तुम्हाला हवे असल्यास फर्निचरवरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस देखील वापरू शकता.

फर्निचरवर जमा झालेले ऑईल अशा प्रकारे काढा

फर्निचरवर जमा झालेले ऑईल काढण्यासाठी अमोनिया आणि गरम पाण्याचा वापर करा. यासाठी या मिश्रणात स्पंज किंवा कपडा भिजवा आणि फर्निचर पुसून काढा. आता ते कोरड्या कापडाने पुसा, जेणेकरून ते स्वतःमध्ये ओलावा शोषून घेणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *