Amol Kolhe post viral: अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे त्यांच्या अभिनयामुळे आणि राजकीय भूमिकांमुळे चर्चेत असतात. ते सोशल मिडियावरही सक्रिय असतात.
अशातच आता अमोल कोल्हे यांची एक पोस्ट सोशल मिडियावर चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक धक्कादायक अनुभव शेयर केला आहे. मुंबईत गाडीने प्रवास करताना त्यांना हा अनुभव आला आहे.
अमोल कोल्हे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, ‘मुंबईत सिग्नल्स वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. मी स्वतः काय प्रकार आहे याची माहिती घेताना त्या भगिनीने थेट मोबाईलवरील मेसेज दाखवला- प्रत्येक चौकात २५००० रूपयांची वसुली व २० वाहनांवर कारवाई झाली पाहिजे!’
पुढे ते लिहितात, ‘मुंबईत 652 ट्रॅफिक जंक्शन आहेत. 25,000×652 = 1,63,00,000/ प्रति दिन म्हणजे फक्त एकट्या मुंबईत तब्बल 1.63 कोटी रुपये.. इतर शहरांचं काय?
संबंधित मंत्रीमहोदयांनी वा अधिकाऱ्यांनी खुलासा केल्यास वाहतूक शाखेचा उपयोग वाहतूक नियमनापेक्षा वसुलीसाठी होतोय का याची जनतेला माहिती मिळेल!
ट्रिपल इंजिन.. ट्रिपल वसुली???’
सध्या अमोल कोल्हे यांची ही पोस्ट व्हायरल होत आहे आणि नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना एकाने लिहिले की, पुण्यात ही तिचं परिस्थिती आहे साहेब… वाहतूक पोलीस काम कमी आणि वसुली जास्त करत आहेत.
तर दुसऱ्याने लिहिले, ‘अगोदर टोल भरायचा मग लगेच समोर ट्रॅफिक हवालदार गाडी बाजूला घेऊन हे पेपर दाखव ते दाखव सर्व क्लिअर असून पण मुद्दाम गाड्या थांबून ठेवतात मग वैतागून गाडी चालक १०० रुपये देतो १०० दिले की लगेच गाडी सोडून देतात.’ यासह अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत संताप व्यक्त केला आहे.