मुंबई । Mumbai
विधानसभा निवडणुकांची घोषणा पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. त्याआधीच उमेदवार जाहीर करण्यात वंचित बहुजन आघाडीने ‘आघाडी’ घेतलेली दिसते. डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील पक्षाने मुंबईत पत्रकार परिषद घेत विधानसभेच्या आणखी दहा जागांवर उमेदवारांची घोषणा केली.
मलकापूर, बाळापूर, परभणी, संभाजीनगर मध्य, गंगापूर, कल्याण पश्चिम, हडपसर, माढ, शिरुळ आणि सांगली या विधानसभा मतदारसंघासाठी वंचितने उमेदवारांची नावं जाहीर केली आहे. सर्व उमेदवार मुस्लिम समाजाचे आहेत. काँग्रेसचे माजी विधानपरिषद आमदार खातिव सैय्यद नातिकुद्दिन यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा देऊन बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. बाळापूर जिल्हा अकोला विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.