maharashtra News

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या भुजबळांच्या पुतळ्याचं कोल्हापुरात दहन; आंदोलनाला आर्य क्षत्रिय समाजाचा पाठिंबा

कोल्हापूर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल अवमानकारक विधान केल्याच्या कारणातून काल (बुधवार) सकल मराठा समाजाने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. या वेळी भुजबळांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. भुजबळांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्याने सर्वत्र तीव्र पडसाद उमटले आहेत. कोल्हापुरातही सकल मराठा समाजाने भुजबळांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास दसरा चौकात आंदोलक जमा झाले.

निषेधाच्या घोषणा देत आंदोलकांनी मंत्री भुजबळ यांच्या पुतळ्याला चपला मारल्या. वसंतराव मुळीक, बाबा पार्टे, दिलीप देसाई, विजय देवणे, संजय पवार, शाहीर दिलीप सावंत, सुभाष जाधव, सुरेश कुराडे, संपतराव चव्हाण-पाटील, अवधूत पाटील, संजय काटकर, चंद्रकांत भोसले, शारंगधर देशमुख, सचिन पाटील, शिवराज पाटील, सुनील पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते. , डॉ.वधक पाटील, गीता हसूरकर, शैलजा भोसले, संयोगिता देसाई, उदय लाड, प्रसन्न शिंदे, विनय कदम, श्रीकांत मानोळे, फिरोज खान वस्ताद, शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, अभिजित खतकर, दिग्विजय मगदूम, मयूर पाटील, आदि. सहभागी झाले.

‘आर्य क्षत्रिय’ समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा आहे
मनोज जरंगे-पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने दसरा चौकात साखळी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला बुधवारी आर्य क्षत्रिय समाजाच्या शिष्टमंडळाने भेट देऊन पाठिंबा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *