पुणे – मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून पुण्यात मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात मनसेच्या वतीने आज आंदोलन करण्यात येत आहे. शहरातील जंगली महाराज रोडवर आंदोलन सुरू आहे.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार पुणे महापालिकेच्या हद्दीतील ज्या दुकानांवर मराठीत फलक नाहीत, अशा सर्व दुकाने आणि आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्याचे पत्रही मनसेने महापालिकेला दिले आहे. तसेच मराठी पाट्यांबाबत महापालिकेने कारवाई न केल्यास मनापासून आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
जंगली महाराज रस्त्यावरील अनेक दुकानांवर इंग्रजी सूचनाफलक आहेत. जंगली महाराज रोडवर अनेक ब्रँड्स आणि कपड्यांची दुकाने असून त्यांचे फलक मराठीत असावेत, अशी मनसेची मागणी आहे. यावेळी काही दुकानांचे इंग्रजीतील फलकही तुटल्याचे दिसून आले.