maharashtra News

Nashik Ramesh Bais : राज्यपाल दौऱ्याच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

Nashik Ramesh Bais : राज्यपाल रमेश बैस येत्या शुक्रवारी (ता. ५) नाशिक दौऱ्यावर येत असल्याने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सोमवारी (ता. १) बैठक घेत शासकीय यंत्रणांना नियोजनाच्या सूचना दिल्या.

राज्यपालांचा संदीप विद्यापीठ येथील प्रस्तावित कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी शर्मा यांनी घेतला.

अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जितीन रहमान, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील, रवींद्र ठाकरे, आप्पासाहेब शिंदे, तहसीलदार अमोल निकम, भीमराज दराडे, पंकज पवार, शरद घोरपडे, श्वेता संचेती, शोभा पुजारी आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शर्मा यांनी दौऱ्याच्या अनुषंगाने नियोजित हेलिपॅड, दौरा ठिकाणी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात यावी. वाहतूक व्यवस्थेचेही योग्य नियोजनाच्या सूचना दिल्या. राज्यपाल ताफ्यातील वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तपासणी करून ती सुस्थितीत असल्याची खात्री करावी.

संदीप विद्यापीठात राज्यपाल भेट देणार असलेल्या ठिकाणी अनुषंगिक सुरक्षा व इतर बाबींच्या व्यवस्थेबाबत संबंधित यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे. संदीप विद्यापीठ येथे राज्यपालांची निवास व्यवस्था, स्वागत त्याचप्रमाणे पदवीदान समारंभात सत्कारार्थी विद्यार्थ्यांचे नियोजनही चोख ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *