भारतीय डाक विभागाने आपली स्मार्ट आणि डिजिटल पार्सल लॉकरची सेवा सुरु केली आहे. या स्मार्ट आणि विश्वासार्ह वितरण प्रणाली पोस्टल कायर्यालयाच्या परिसरातून ग्राहक कधीही पार्सल आणि पत्रे गोळा करू शकतात. या स्मार्ट आणि डिजिटल प्रणालीमुळे ग्राहकांच्या पार्सल सेवेत सुलभता येणार आहे.
स्मार्ट आणि डिजिटल पार्सल लॉकर ही उच्च-तंत्र सुव्यवस्थित आणि कार्यक्षम वितरण प्रणाली कोणत्याही खर्चाशिवाय लोकांना पार्सली ओटीपी आधारित डिलिव्हरी प्रदान करते. ही पार्सल लॉकरची सेवा ठाणे शहरातील ठाणे मुख्य पोस्ट ऑफिस, नवी मुंबई शहरातील वाशी सब पोस्ट ऑफिस आणि पुण्यातील इन्फोटेक पार्व सब पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे.
तसेच मुंबई जीपीओ, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, घाटकोपर पश्चिम आणि मुंबईतील पाच स्थानांवर लवकरच सेवा सुरु होणार आहे. डिजिटल पार्सल लॉकर सुविधेच्या माध्यमातून ग्राहक आपल्या सोयीनुसार पोस्टातून पार्सल किंवा पत्रे कलेक्ट करू शकतील.या सुविधाच्या जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल किशन कुमार शर्मा यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहेत.
पार्सल लॉकरचा असा करा वापर –
– भारतीय डाक कडून डिजिटल पार्सल लॉकर मध्ये पार्सल ठेवले जाईल.
– ग्राहकाला सदर पार्सल घेण्याकरिता एक ओटीपी मिळेल.
– ग्राहकाला त्याच्या पार्सलची डिलिव्हरी सदर डिजिटल पार्सल लॉकर मधून कोणत्याही वेळेस घेता येईल
– डाक निर्यात केंद्रे –
निर्यात उपक्रमांना चालना देण्यासाठी आणि निर्यातीसंबंधी प्रक्रिया सुरु करण्यासाठी तसेच निर्यातदारांना एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी टपाल विभागाने महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि प्रमुख टपाल कार्यालयामध्ये डाक घर निर्णयात केंद्रे सुरू केली आहेत.पार्सल पॅकेजिंग मटेरियल, पोस्टल बिल ऑफ एक्सचेंज (पीबीई ), कस्टम क्लिअरन्स सुविधा, मोठ्या प्रमाणावर काम करणाऱ्या ग्राहकांसाठी पिकअप सुविधा इत्यादी सुविधा निर्यातदारांना एकाच छताखाली पुरवल्या जात आहेत.
आजपर्यंत, महाराष्ट्र आणि गोवा राज्यात ६९ डाक घर निर्यात केंद्रे (DNKs) कायर्यान्वित झाली आहे. तसेच, निर्यातदार, महसूल विभागासारख्या राज्य सरकारच्या यंत्रणा आणि स्थानिक प्राधिकरण तसे कस्टम प्राधिकरणांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी विभागाने ५८ कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. सदर सेवा छोट्या स्वरुपातील स्थानिक निर्यातदारांना तसेच ग्रामीण भागातील बचतगट यांच्यासाठी नक्कीच पूरक / चालना देणारी ठरेल. परिणामी, महाराष्ट्र आणि गोव्यालील १४० निर्यातदार आधीच सा सेवे-अंतर्गत नोंदणीकृत झाले आहेत आणि डीएनके सुविधेचा वापर करत आहेत. २०२३ मध्ये डीएनके सुविधेअंतर्गत १५ हजार १८५ पार्सल / पत्रे बुक केली गेली आहेत.