Pune Accident News: पुण्यात मद्यधुंद कारचालकाने दुचाकीला उडवले आहे. भरधाव कार चालवून दुचाकीला धडक दिली या धडकेत हवेत उडून आदळल्याने दुचाकी वरील तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर तिचा मित्र गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी रात्री पुण्यात खराडी परिसरात घडला. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी कारचालक आरोपी भव्य अशोक नामदेव याला अटक केली आहे.
पोलिसांनी सोनाली अविनाश रोकडे (२६) असे मृत तरुणीची ओळख पटवली आहे. तिचे नातेवाईक अभिषेक गायकवाड (२९) याप्रकरणी या प्रकरणी चंदन नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपींवर कलम २७९, ३३८, ३०४ (अ), ४२७ आणि मोटार वाहन कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली एका मेडिकल दुकानात काम करत होती. अभिषेक गायकवाड तिला दुचाकीवरून घरी सोडत असताना, पहाटे १२:३० च्या सुमारास मागून आलेल्या एका कारने त्यांना धडक दिली.
कारने दुचाकीला फरफटत नेल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे सोनालीला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला तर गायकवाड यांनाही काही जखमा झाल्या. दुचाकी खाली आल्यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या आणखी तीन वाहनांना धडकली, असे पोलिसांनी सांगितले.