maharashtra News

Pune Scam : महापालिकेत कोरोना कालावधीत ९० लाखांचा घोटाळा उघडकीस; आरोग्य प्रमुखासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे – कोरोनाच्या काळात पुणे महापालिकेत लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना चाचणी किट आणि औषधांची विक्री करून 80 ते 90 लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी महापालिकेचे तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात सतीश बाबुराव कोळसुरे (वय 42, रा. पिंपळे गुरव) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ.आशिष भारती, डॉ.अरुणा सूर्यकांत तायडे, डॉ.ऋषिकेश हनुमंत गार्डी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये कोरोना महामारीच्या काळात राज्य सरकारने वारजे. अरविंद बारटक्के हॉस्पिटलसाठी कोरोना चाचणी किट, सॅनिटायझर आणि औषधे उपलब्ध करून देण्यात आली. परंतु तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. भारती यांच्यासह तिघांनी कागदपत्रांमध्ये फेरफार आणि खोट्या नोंदी केल्या.

वारजे येथील रुग्णालयात कोरोना चाचणी किट आणि औषधांचा वापर केल्याचे कागदपत्रांवरून राज्य सरकार आणि महापालिकेला दिसून आले. त्यानंतर चाचणी किट, औषधे खासगी प्रयोगशाळा व रुग्णालयांना विकून 80 ते 90 लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार कलम १५६ (३) अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *