maharashtra News

Rajinikanth Reaction On Ram Mandir : ‘तुम्हाला सगळीकडेच राजकारण कसं दिसतं’? रजनीकांत यांनी राम मंदिराबाबत मोठी प्रतिक्रिया!

Rajinikanth On Ram Temple : अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर सोशल मीडियावर अनेक सेलिब्रेटींचे फोटो व्हायरल झाले होते. त्यात बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह आलिया भट्ट, रजनीकांत, रणबीर कपूर, कतरिना कैफ यांनी फोटो पोस्ट केले होते.

साऊथचे थलायवा म्हणून लोकप्रिय असणाऱ्या रजनीकांत यांचा फोटो आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर आता रजनीकांत हे चैन्नईमध्ये आल्यानंतर त्यांनी मीडियाशी बातचीत केली आहे. त्याचा व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. राम मंदिराचे दर्शन घेणाऱ्या त्या १५० जणांमध्ये मी देखील होतो. अशी भावना रजनीकांत यांनी व्यक्त केली आहे. 

आपल्या कुटूंबियासमवेत रजनीकांत हे अयोध्येला गेले होते. त्या सोहळ्यावरुन चैन्नईला आल्यानंतर त्यांना मीडियानं घेरले असता ते म्हणाले की, राम मंदिराचे दार जेव्हा उघडले गेले तेव्हा त्या मुर्तीला प्रथम पाहणाऱ्यांमध्ये मी देखील होतो. त्या १५० लोकांमध्ये माझ्या नावाचा समावेश करावा लागेल. मला खूप आनंद झाला. माझ्या मनात समाधानाची भावना आहे.

माझ्यासाठी तो काही राजकीय विषय नाही. तो आध्यात्मिक आणि भावनिक विषय आहे हे गोष्ट लक्षात घ्या. आपण प्रत्येकवेळी सगळ्याच गोष्टींचा राजकीय अर्थ का लावतो, प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात, आणि ती एकच असावीत असा अट्टाहास का धरावा, असे मतही रजनीकांत यांनी यावेळी व्यक्त केले.

रजनीकांत यांना त्या कार्यक्रमामध्ये बसण्यासाठी खुर्ची मिळाली नाही का, असा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी अशा बातम्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. या अशा बातम्यांना काहीच अर्थ नाही. ते म्हणाले, सोशल मीडियावर जे काही व्हायरल होत आहे त्याला तुम्ही खरे समजता त्यामुळे घोळ होतो. तुम्ही जसे समजता तसे काही झालेलं नाही. तो सोहळा खूपच प्रभावी होता. छान झाला. अशा शब्दांत रजनीकांत यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *