Supriya Sule on Rohit Pawar ED Enquiry : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. सध्या रोहित पवार हे ईडीच्या कार्यालयात असून बारामती Agro प्रकरणी त्यांची चौकशी सुरु आहे.
मागील पाच तासांपासून रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे शेजारीच असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात बसून आहेत.
जोपर्यंत रोहित पवार हे ईडीच्या कार्यालयातून बाहेर येत नाहीत, तोपर्यंत आपण इथून जाणार नसल्याची भूमिका सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे. काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना सुळेंनी ईडीवर विश्वास दाखवला होता. ”माझा ईडीवर पूर्ण विश्वास आहे” असं विधान त्यांनी केलं होतं.
सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या होत्या की, “चौकशी पारदर्शक आणि निष्पक्ष असावी. माझा ईडीवर पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे की, ते रोहितची बाजू ऐकतील. आम्ही चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार आहोत. कारण आमच्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही.”
विजय सत्याचाच होईल- सुळे
”विजय हा सत्याचाच होईल.. हा काळ संघर्षाचा आहे. आव्हान येत आहेत पण, आव्हानांवर मात करू, पण सत्याच्याच मार्गाने चालू. दुर्दैवाने अनेक एजन्सीचा गैरवापर केला जातो. रोहित पवारांना नोटीस येणं ही आमच्यासाठी आश्चर्याची गोष्ट नाही. त्यांनी संघर्ष यात्रा काढली. शेतकरी, कष्टकरी, शोषित, विद्यार्थी यांच्यासाठी काहीतरी करू पाहणाऱ्या रोहित पवारांवर कारवाई होत असून हे सूडाचं राजाकरण सुरु आहे” असा आरोप सुळेंनी केला.