पर्यटनाला (Tourism) चालना देण्यासाठी ‘रोप कार’ बसविण्याचा विचार सरकारने चालविला आहे.
बेळगाव : सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावर (Saundatti Yellamma Dongar) पर्यटनाला (Tourism) चालना देण्यासाठी ‘रोप कार’ बसविण्याचा विचार सरकारने चालविला आहे. राज्यातील पर्यटन स्थळांचा कायापालट करण्यासह पर्यटनाला चालना देण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी भागीदारीवर पर्यटन स्थळांचा विकास केला जाणार आहे. यामध्ये यल्लम्मा डोंगराचा समावेश आहे.
विधानसभेत प्रश्नोत्तरावेळी पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी सौंदत्ती डोंगरासह अंजनाद्री टेकडी, नंदीबेट्ट या ठिकाणी ‘रोप कार’ सुरू करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती विधानसभेत दिली. ‘रोप कार’पासून पर्यटकांना कितपत फायदा होईल, याची माहिती घेतली जाणार आहे. त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सरकारकडून पुढील पावले उचलली जातील, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, सौंदत्ती डोंगरावर नवीलु तीर्थ येथे ॲडवेंचर कॅम्प सरकारकडून सुरू केले जात होते. मात्र, ते अद्याप प्रलंबितच आहे. राजहंसगड किल्ल्यावर देखील ‘रोप वे’ उभारण्याचा विचार यापूर्वी सुरू होता. किल्ल्याचा विकास करण्यासह पर्यटनाला चालना देणे हा यामागील प्रमुख उद्देश होता. किल्ल्याचा विकास होऊन या ठिकाणी भव्य सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्यात आला. परंतु, ‘रोप वे’ संकल्पना अस्तित्वात आलीच नाही.

पर्यटन विभाग उदासीन
बेळगावातील अनेक पर्यटन स्थळांना विकासाची गरज आहे. परंतु, सध्या बेळगावातील पर्यटन विभाग उदासीन आहे. जोपर्यंत पर्यटन विभागात बदल केले जाणार नाहीत, तोपर्यंत पर्यटनस्थळांचा विकास आणि खासगी भागीदारी यावर केवळ चर्चा होत राहील. आता मंत्री एच. के. पाटील यांनी सौंदत्ती डोंगरावर ‘रोप कार’ सुरू करण्याच्या घोषणेची कितपत अंमलबजावणी होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.