maharashtra News

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर घातपात करण्याचा कंट्रोल रुमला फोन; मुंबई पोलीस सतर्क

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर मोठा घातपात होणार असल्याचा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आला आहे. त्यानंतर एकच खळबळ उडाली. या फोननंतर मुंबई पोलीस आणि मुंबईतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबई-गुजरात ट्रेनने प्रवास करणाऱ्या ४ ते ५ व्यक्तींचे मुस्लीम संभाषण ऐकल्यानंतर नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली आहे. हे मुस्लीम तरुण उर्दूमधून संभाषण करत असल्याची माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने दिली आहे.

याबाबत माहिती देताना, मोहम्मद अली रोड येथे रुम रेंटवर घेणार असल्याचे फोन करणाऱ्या व्यक्तीने नियंत्रण कक्षाला सांगितलं आहे. या माहितीनंतर मुंबई पोलीस सतर्क झाले असून कसून तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *