मार्केट इन्टेलिजन्स

Byju’s Crisis: कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठी बायजूचे रवींद्रन यांनी घर ठेवले गहाण

Byju’s Crisis: कंपनीकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठीही पैसे नाहीत.

Byju’s Crisis: भारतातील आघाडीची एडटेक फर्म बायजूची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. स्टार्टअप कंपनीकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठीही पैसे नाहीत. बायजूचे संस्थापक बायजू रवींद्रन यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी त्यांचे घर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची घरे गहाण ठेवली आहेत. बायजूच्या संस्थापकाने सुमारे 12 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 100 कोटी रुपये) कर्ज घेण्यासाठी त्यांचे घर गहाण ठेवले आहे.

अहवालानुसार, बायजू रवींद्रन यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी त्यांचे निवासस्थान आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मालकीची घरे गहाण ठेवली आहेत.

गहाण ठेवलेल्या मालमत्तेमध्ये कुटुंबाची बेंगळुरूमधील दोन निवासस्थाने आहेत. या बदल्यात रवींद्रन यांच्या कंपनीने 12 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज घेतले आहे. मात्र, या कर्ज व्यवहाराचा खुलासा अद्याप झालेला नाही.

Byju ने नुकताच आपला US-आधारित Kids Digital Reading Platform विकल्यानंतर, कंपनी अजूनही अडचणीत आहे. बायजूसच्या रवींद्रनने त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या मालकीची मालमत्ता गहाण ठेवून कर्मचाऱ्यांना पगार देण्याचा निर्णय घेतला आहे.

बायजूची मूळ कंपनी थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठी बँकेकडे आपली मालमत्ता गहाण ठेवून हे पाऊल उचलले आहे. रवींद्र आणि बैजू यांच्या प्रवक्त्यांनी या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला.

या वर्षी नोव्हेंबरमध्ये, ईडीने थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेडला एफडीआय अंतर्गत सुमारे 28,000 कोटी रुपये मिळाल्याचा आरोप करत बैजूवर छापा टाकला, तर तपासात असेही आढळून आले की विदेशी गुंतवणुकीच्या नावाखाली सुमारे 9,000 कोटी रुपये परदेशात पाठवले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *