तेजीचा परिणाम : डिसेंबर मध्यापर्यंत१.७४ लाख कोटींची भर
सर्वाधिक खरेदी आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील शेअरची करण्यात आली आहे, असेही ‘एनएसडीएल’च्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. हा कल यापुढेही कायम राहिल्यास ऑगस्ट 2022 नंतरची सर्वोच्च पातळी गाठली जाईल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. मागील दोन महिन्यांत विक्री केल्यानंतर नोव्हेंबरमध्ये परकी गुंतवणूकदार निव्वळ खरेदीदार बनले होते.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपात करण्याचे सूतोवाच केल्याने अमेरिकी रोख्यांचे उत्पन्न कमी झाले आहे, तर भारतीय रिझर्व्ह बँकेने भारताचा विकासदराचा अंदाज वाढवला आहे.
त्याचबरोबर अनेक जागतिक पतमानांकन संस्थांनीदेखील भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दरात सुधारणा केली आहे. नुकत्याच झालेल्या राज्यातील निवडणूक निकालांनी 2024 मध्ये स्थिर सरकार मिळण्याचा आणि धोरण सातत्य राहण्याचा विश्वास निर्माण केला आहे.
अशा विविध कारणांमुळे परकी गुंतवणूकदारांमध्ये उत्साह वाढला असून, खरेदीला चालना मिळाली आहे, असे विश्लेषकांनी सांगितले. डिसेंबरच्या मध्यापर्यंत ‘निफ्टी’ आणि ‘सेन्सेक्स’ प्रत्येकी 6.6 टक्क्यांनी वाढले असून, जुलै 2022 नंतरची ही सर्वोत्तम वाढ आहे. यामुळे देशांतर्गत शेअर बाजार पुढेही वाढण्याचा अंदाज आहे, असे ‘प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीज’चे अविनाश गोरक्षकर यांनी सांगितले.
गुंतवणूक वाढण्याची कारणे…
- अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बँकेचे मुख्य व्याजदर कमी करण्याचे सूतोवाच
- अमेरिकी रोख्यांच्या उत्पन्नात झालेली घसरण
- भारताच्या विकासदराच्या अंदाजात विविध संस्थांनी केलेली वाढ
- भारतीय शेअर बाजारात तेजी
- राहण्याचा अंदाज