Post Office MIS : नवं वर्ष नुकतंच सुरु झालंय आणि या 2024 मध्ये तुम्हाला चांगल्या योजनेत गुंतवणूक करायची असेल ज्यामध्ये तुमचे जमा केलेले पैसे सुरक्षित असतील आणि तुम्हाला नियमित उत्पन्नही मिळेल, तर ही बातमी वाचाच.
पोस्ट ऑफीसची मासिक बचत योजना (Post Office Monthly Income Scheme 2024) तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला व्याज मिळत राहते.
पोस्ट ऑफिस एमआयएस (Post Office MIS) खाते सिंगल आणि जॉइंट अशा दोन्ही प्रकारे उघडता येते. तुम्ही तुमची पत्नी, भाऊ किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत संयुक्तपणे हे खाते उघडू शकता. असे केल्यास तुमच्यासाठी ठेवीची मर्यादाही (Deposit Limt) वाढते. यातून तुम्हाला अधिक फायदा होतो.
पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना ही एक डिपॉजिट स्कीम आहे. यामध्ये एकरकमी ठेवीवर दरमहा उत्पन्न मिळते. खात्यावर मिळणारे व्याज दर महिन्याला पोस्ट ऑफिस बचत खात्यात भरले जाते. 5 वर्षानंतर तुम्ही तुमची जमा केलेली रक्कम काढू शकता.
या योजनेत तुम्ही सिंगल किंवा जॉइंट अकाउंट उघडू शकता. जॉइंट अकाउंट दोन किंवा तीन लोक एकत्र उघडू शकतात. तुम्ही एका खात्यात 9 लाख रुपये आणि जॉइंट अकाउंटमध्ये 15 लाख जमा करू शकता. साहजिकच जास्त ठेवी असतील तर कमाईही जास्त होईल. अशा परिस्थितीत तुम्ही आणि तुमच्या पत्नीने मिळून हे खाते उघडल्यास, तुम्हाला केवळ व्याजातून 5 लाखाहून अधिक कमाई होईल.
पोस्ट ऑफिस मासिक बचत योजनेत सध्या 7.4 टक्के दराने व्याज उपलब्ध आहे. जर तुम्ही तुमच्या पत्नीसह यामध्ये 15 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला 7.4 टक्के व्याजदराने दरमहा 9,250 रुपये उत्पन्न मिळेल. अशा प्रकारे, एका वर्षात 1,11,000 रुपये मिळतील. 1,11,000 x 5 = 5,55,000 अशा प्रकारे, 5 वर्षात दोघांनाही 5,55,000 रुपये फक्त व्याजातून मिळतील.
तुम्ही हे खाते एकट्याने उघडले तर तुम्ही जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा करू शकता. या प्रकरणात, तुम्हाला दरमहा 5,550 रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे, तुम्ही एका वर्षात 66,600 रुपये व्याज म्हणून घेऊ शकता आणि 5 वर्षांमध्ये तुम्ही केवळ व्याजाद्वारे 3,33,000 रुपये कमवू शकता.
नोंद – क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.