SEBI: सेबीने युनिटेक अॅडव्हायझर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे दोन संचालक अजय चंद्रा आणि संजय चंद्रा यांना 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. काही वर्षांपूर्वी अनेक वेळा अतिरिक्त वेळ देऊनही तीन रिअल इस्टेट फंड बंद न केल्याप्रकरणी ते दोषी आढळले आहेत. त्यांना एकत्रितपणे दंड भरावा लागेल.
सेबीने हे फंड हाऊस अनेक नियमांचे उल्लंघन करत होते. या फंड हाउसचे नाव औरम अॅसेट मॅनेजमेंट आहे. युनिटेक अॅडव्हायझर्सने आपल्या योजना वेळेवर बंद न करण्याबरोबरच त्यांच्या समूह कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे गुंतवले असल्याचे आढळून आले. त्यांनी अनेक गुंतवणुकीचे निर्णय घेतले जे चुकीचे होते.