राजकारण

Mangalwedha News : आगामी निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या, मंगळवेढा सर्वपक्षीय नेत्यांचं आवाहन

मंगळवेढा : येणाऱ्या सर्व निवडणुका या ईव्हीएम वर न घेता बॅलेट मशीन वर घ्यावी अशी मागणी मंगळवेढ्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी तहसीलदार मदन जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी प्रा. येताळा भगत,अॅड राहुल घुले, राजाभाऊ चेळेकर,अॅड रविकरण कोळेकर,अॅड भारत पवार,

दत्तात्रय भोसले, प्रथमेश पाटील,पांडुरंग जावळे,एकनाथ फटे,विष्णुपंत शिंदे,पांडुरंग निराळे,समाधान हेंबाडे,अशोक माने, सिदराया माळी,अंकुश शेंबडे,अशोक सोनवणे,राकेश पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की येणाऱ्या काळातील लोकसभा विधानसभा व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी आमची मागणी असून तशा प्रकारची निर्णय न घेतल्यास भविष्यात तीव्र स्वरूपात सर्व पक्षांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देखील या निवेदनामध्ये नमूद केला यावेळी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील इतर प्रश्नावर चर्चा केली.

शिवसेनेचे तालुकाध्यक्ष येताळा भगत यांनी दुष्काळात तालुका समावेश झाल्यामुळे सर्वच मंडलला सरसकट पिक विमा देण्याची मागणी केली, येणाऱ्या सर्व निवडणुका बॅलेट पेपर वर घेण्याची सर्वपक्षीयाची मागणी शासनाला कळवावी,

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अॅड राहुल घुले यांनी खरीप हंगामातील पीक विम्यापोटी अॅग्रीम रक्कम ही रब्बीच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना खात्यावर जमा होणे अपेक्षित आहे मात्र अद्यापही ती रक्कम सरसकट जमा नाही ती वेळेत जमा झाली तर शेतकऱ्यांना त्या रब्बी पेरणीसाठी उपयोगी पडेल,

शिवसेनेचे शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले यांनी केशरी कार्डधारकांना माल मिळत नसल्याचे सांगितले, तर प्रहारचे समाधान हेंबाडे यांनी अन्नसुरक्षा योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत दिला जावा, वंचित बहुजन आघाडीचे अशोक माने यांनी

अन्नसुरक्षा योजनेसाठी लाभार्थी निवडलेली यादी ही ग्रामपंचायत स्तरावर लावण्यात यावी व ग्रामसभेसाठी महसूलचा कर्मचाऱ्यांची उपस्थिती सक्तीची करण्यात यावी,प्रहारचे तालुका उपाध्यक्ष राकेश पाटील यांनी पीक विम्याची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यवर कधी जमा होणार हे विचारले.

काँग्रेसचे शहराध्यक्ष राजाभाऊ चेळेकर यांनी वगळलेले तीन महसूल मंडळांना पिक विमा देण्याची मागणी केली. काँग्रेसचे अॅड रविकिरण कोळेकर यांनी पिक विमा कंपनीच्या अधिकाय्रासमवेत पुन्हा सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यासमवेत बैठक घेण्याची मागणी करत सरसकट सर्वांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी,

यातील काही प्रश्नावर तहसीलदार मदन जाधव यांनी समाधान कारक उत्तरे दिली अन्नसुरक्षा यादीत नव्याने समाविष्ट करताना तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीकडून विहित नमुन्यात प्रस्ताव सादर केले नाहीत शिवाय लाभार्थ्यांचा प्राधान्यक्रम योग्य प्रकारे दिला नाही,

पिक विम्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी यांना तालुक्यातील वगळलेल्या महसूल मंडलच्या संदर्भातील विषय कानावर घातला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत शासनाला देखील कळवले आहे लवकरच या शेतकऱ्याला पिक विमा देण्याच्या संदर्भात सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास त्यांनी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *