विज्ञान तंत्रज्ञान

Amazon Sale Smartphone Offers : अमेझॉनचा ‘रिपब्लिक डे’ सेल झाला सुरू; ‘या’ स्मार्टफोनवर मिळतोय तगडा डिस्काउंट!

Amazon Great Indian Republic Day Sale : अमेझॉनचा ग्रेट इंडियन रिपब्लिक डे सेल प्राईम यूजर्ससाठी सुरू झाला आहे. आता आज दुपारी 12 वाजेपासून इतर यूजर्सनाही याचा अ‍ॅक्सेस मिळेल. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठी सूट मिळत आहे.

या सेलमध्ये SBI क्रेडिट कार्ड यूजर्सना 10 टक्के अधिक डिस्काउंट मिळणार आहे. तुम्ही जर नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर या सेलमध्ये काही चांगल्या ऑफर्स तुम्हाला मिळू शकतात. यातील काही स्मार्टफोन ऑफर्सची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

iPhone 13

अ‍ॅपल आयफोन 13 च्या 128 GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत सध्या 59,900 रुपये आहे. मात्र अमेझॉनच्या सेलमध्ये हा आयफोन तुम्ही 50,999 रुपयांना खरेदी करू शकता. SBI कार्ड वापरल्यास यात आणखी 10 टक्के सूट मिळेल. तसंच जुना फोन एक्सचेंज केल्यास यात 41,250 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते.

Samsung Galaxy A34

सॅमसंगच्या ए सीरीजमधील गॅलेक्सी A34 हा एक उत्तम स्मार्टफोन आहे. सेलमध्ये हा केवळ 27,499 रुपयांना उपलब्ध आहे. यामध्ये एक्सचेंज आणि कार्ड ऑफर जोडल्यास ही किंमत आणखी कमी होऊ शकते.

Redmi 12 5G

रेडमी 12 5G या स्मार्टफोनची मूळ किंमत 17,999 रुपये आहे. मात्र अमेझॉनच्या सेलमध्ये हा स्मार्टफोन केवळ 11,999 रुपयांना उपलब्ध आहे. ही किंमत कार्ड ऑफर्स जोडून आहे.

Honor 90 5G

हॉनर 90 या स्मार्टफोनची मूळ किंमत 47,999 रुपये आहे. अमेझॉनच्या रिपब्लिक डे सेलमध्ये सर्व ऑफर्स लागू केल्यानंतर हा स्मार्टफोन केवळ 19,999 रुपयांना मिळत आहे. या फोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

POCO C51

पोकोच्या या बजेट स्मार्टफोनची मूळ किंमत 10,999 रुपयांना आहे. मात्र, सर्व ऑफर्स लागू केल्यानंतर अमेझॉनच्या सेलमध्ये हा स्मार्टफोन केवळ 5,999 रुपयांना मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *