विज्ञान तंत्रज्ञान

Chandrayaan 3 Returns Home : ‘चांद्रयान-3’ची घरवापसी! प्रॉपल्शन मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेत परतलं; इस्रोचा प्रयोग यशस्वी

ISRO Moon Mission : चांद्रयान-3 मोहिमेच्या माध्यमातून भारताने इतिहास रचला होता.

चांद्रयान 3 अपडेट: चांद्रयान-3 मिशनबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. चांद्रयान-3 चे प्रोपल्शन मॉड्यूल आता पृथ्वीच्या कक्षेत परत आले आहे. इस्रोने आपल्या X हँडलद्वारे याबाबत माहिती दिली. असा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला असून तो यशस्वी झाल्याचे इस्रोने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आपण पृथ्वीवरून चंद्रावर वस्तू पाठविण्यास सक्षम आहोत. मात्र, चंद्रावरून काहीतरी पृथ्वीवर परत आणण्यास आपण सक्षम आहोत, हे इस्रोने या प्रयोगातून सिद्ध केले आहे. इस्रोने चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत कसे ढकलले. हीच युक्ती चालवत आता चांद्रयान-३ चे प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत आणण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, इस्रोने सुरुवातीपासूनच याचे नियोजन केले नव्हते. विक्रम लँडरची दुसरी उडी जशी अनपेक्षितपणे यशस्वी ठरली, तसाच हा प्रयोगही यशस्वी झाला आहे.

भारताने घडवलेला इतिहास
14 जुलै 2023 रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून चांद्रयान-3 लाँच करण्यात आले. 23 ऑगस्ट रोजी भारताने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करून नवा इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. यानंतर चांद्रयान-3 ने पुढील 14 दिवसांचा अपेक्षित डेटा गोळा करून मिशन पूर्ण केले.

सुप्तावस्थेत प्रज्ञा-विक्रम
चांद्रयान-३ चे प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर चंद्रावर हायबरनेट करत आहेत. मिशन पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्लीप मोडवर ठेवण्यात आले. मग चंद्रावर रात्र सुरू झाल्यामुळे ही दोन्ही उपकरणे गोठली. सूर्योदयानंतर पुन्हा लँडर-रोव्हर सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यात अपयश आले. यानंतर मिशन पूर्णपणे संपल्याचे घोषित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *