विज्ञान तंत्रज्ञान

Honor X Thar : स्मार्टफोनवरुन चालवली ‘थार’, डिस्प्लेला आला नाही एकही स्क्रॅच! व्हिडिओ होतोय व्हायरल

Honor Smartphone Vs Thar : ऑनर कंपनी भारतात लवकरच एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन किती मजबूत आहे हे दाखवण्यासाठी कंपनी विविध प्रकारचे प्रयोग करताना दिसत आहे. यासाठीच कंपनीने या फोनवरुन चक्क थार गाडी चालवून दाखवली आहे. या प्रयोगाचा व्हिडिओ कंपनीचे भारतातील प्रमुख माधव शेठ यांनी आपल्या एक्स हँडलवरुन शेअर केला आहे.

काही दिवसांपूर्वीच माधव शेठ यांनी एका व्हिडिओमध्ये हा स्मार्टफोन किती मजबूत आहे हे दाखवलं होतं. त्यांनी वेगवेगळ्या उंचीवरुन हा फोन खाली फेकून त्याची स्क्रीन किती मजबूत आहे हे दाखवलं होतं. यानंतर आता नव्या व्हिडिओमध्ये त्यांनी चक्क थार गाडी या फोनवरुन नेली आहे.

व्हिडिओमध्ये दिसतंय की ऑनरचा हा स्मार्टफोन जमीनीवर ठेवला आहे. यानंतर त्यावरुन थार गाडीला नेलं आहे. यानंतर फोन उचलून तपासला असता, त्याच्या स्क्रीनवर एक स्क्रॅचही नसल्याचं स्पष्ट झालं.

कधी होणार लाँच?

या नव्या स्मार्टफोनचं नाव Honor X9b असं असू शकतं. याची लाँच डेट अद्याप जाहीर करण्यात आली नसली, तरी मार्च किंवा एप्रिल महिन्यात हा फोन लाँच केला जाऊ शकतो.

सॅमसंगने केला धमाका

दरम्यान, सॅमसंगने 17 जानेवारीला आपली नवी स्मार्टफोन सीरीज लाँच केली आहे. Samsung Galaxy S24 या सीरीजमध्ये तीन नवे फोन लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये गॅलेक्सी एआयचे भन्नाट फीचर्सही देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *