Iran Animal Capsule Launch : एकीकडे इस्राइल-हमास युद्ध सुरू असताना, शेजारीच असणाऱ्या इराणने एक मोठी कामगिरी केली आहे. इराणने अवकाशात एक कुपी सोडली असून या कुपीमध्ये काही प्राणी आहेत. या प्राण्यांवर अवकाशात होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला जाणार असल्याचे इराण सरकारने स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे या कॅप्सुलमध्ये एक-दोन नव्हे तर कित्येक प्राणी आहेत. इराणच्या या मोहिमेकडे अमेरिका, इस्राइल आणि जगभरातील इतर देश लक्ष ठेऊन आहेत. पृथ्वीपासून १३० किलोमीटर अंतरावर असलेल्या कक्षेत ही ५०० किलो वजनाची कुपी स्थिर करण्यात आली आहे. कुपीमध्ये कोणते प्राणी आहेत, हे इराणने जाहीर केलेले नाही.
भविष्यात अवकाशात मानवाला पाठवण्याची तयारी इराण करत आहे. याचाच भाग म्हणून प्राण्यांनी भरलेली ही कॅप्सुल अवकाशात पाठवली आहे. इराणने यापूर्वी 2013 साली देखील एका माकडाला सुरक्षितपणे अवकाशात पाठवून पृथ्वीवर परत आणल्याचा दावा केला होता.