विज्ञान तंत्रज्ञान

ISRO XPoSat Launch : अपेक्षित कक्षेत पोहोचला ‘एक्सपोसॅट’ उपग्रह; कशा प्रकारे पार पडली इस्रोची मोहीम?

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रोने एक महत्वाकांक्षी मोहीम राबवली. आज सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी एक्सपोसॅट या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आलं.

महिलांनी तयार केलेल्या उपग्रहाचंही प्रक्षेपण

तिरुअनंतपुरम स्थित ‘इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी फॉर वूमेन’ने विकसित केलेला एक उपग्रहदेखील ‘एक्स्पोसॅट’बरोबर प्रक्षेपित करण्यात आला. सौर विकिरण आणि अतिनील किरणांचा निर्देशांक मोजणे असा या उपग्रहाचा उद्देश्य आहे. एक्सपोसॅटला आपल्या कक्षेत सोडल्यानंतर आता टप्प्या टप्प्याने इतर उपग्रह देखील त्यांच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येणार आहेत.

अपेक्षित कक्षेत पोहोचला ‘एक्सपोसॅट’ उपग्रह; इस्रोची या वर्षातील पहिली मोहीम यशस्वी!

चौथ्या टप्प्यातील इग्निशन बंद करण्यात आलं आहे. आता Xposat उपग्रहाला त्याच्या निश्चित कक्षेत प्रस्थापित करण्यात आलं आहे.

ISRO Xposat : मोहिमेच्या अंतिम टप्प्याला सुरुवात

पीएसएलव्ही रॉकेटचं प्रक्षेपण होऊन 17 मिनिटे झाली आहेत. आता चौथ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली आहे. हा अंतिम टप्पा असून, यामध्ये उपग्रहाला अपेक्षित ठिकाणी प्रस्थापित करेल.

PSLV C58 : तिसरा टप्पा वेगळा

पीएसएलव्ही रॉकेटचा तिसरा टप्पा वेगळा करण्यात आलेला आहे. एक्सपोसॅट उपग्रहाची कोस्टिंग फेज असूनही सुरू आहे. यानंतर PS4 टप्पा सुरू करण्यात येईल.

Xposat Mission : तिसऱ्या टप्प्याचा कार्यकाळ पूर्ण

तिसऱ्या टप्प्याचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. या टप्प्यातील इंजिन बंद झालं आहे. सध्या कोस्टिंग फेज सुरू आहे. पीएसएलव्ही रॉकेट हे अजूनही उपग्रहाशी जोडलेलं आहे.

PSLV C58 : दुसरा टप्पा वेगळा

पीएसएलव्ही यानाचा दुसरा टप्पा वेगळा झाला असून, तिसऱ्या टप्प्याचं इग्निशन करण्यात आलं आहे. तिसऱ्या टप्प्याचा परफॉर्मन्स नॉर्मल असल्याची माहिती रेंज ऑपरेशन डायरेक्टर यांनी दिली आहे.

ISRO Xposat : पहिला टप्पा वेगळा

रेंज ऑपरेशन डायरेक्टरने दिलेल्या माहितीनुसार, रॉकेटचा पहिला टप्पा वेगळा झाला आहे. दुसऱ्या टप्प्याचा परफॉर्मन्स नॉर्मल असल्याची माहिती इस्रोने दिली आहे.

अवकाशात झेपावलं PSLV

एक्सपोसॅट उपग्रहाला घेऊन PSLV रॉकेट अवकाशात झेपावलं आहे.

PSLV C58 : मोहिमेच्या संचालकांनी दिली परवानगी

इस्रोच्या एक्सपोसॅट मोहिमेच्या संचालकांनी मोहिमेसाठी परवानगी दिली आहे. यानंतर आता ऑटोमॅटिक लाँच सीक्वेन्स सुरू करण्यात आला आहे.

ISRO New Launch : अंतिम चाचणी सुरू

सध्या इस्रोचे वैज्ञानिक सध्या सर्व इंजिन आणि यंत्रांची चाचणी घेत आहेत. सर्व उपकरणे योग्यरित्या सुरू असल्याची खात्री होताच ऑटोमॅटिक लाँच प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

Xposat launch : अवघी 20 मिनिटे बाकी

एक्सपोसॅट मोहिमेच्या प्रक्षेपणासाठी अवघी 20 मिनिटं शिल्लक आहेत. सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात येईल.

PSLV अत्यंत भरवशाचं रॉकेट – जी. माधवन नायर

एक्सपोसॅट ही मोहीम आज लाँच होत आहे. इस्रोच्या पोलार सॅट लाँच व्हेईकल, म्हणजेच PSLV रॉकेटचे हे 60 वे उड्डाण असणार आहे. हे भारताचं अत्यंत भरवशाचं रॉकेट आहे. याचा सक्सेस रेट 95% आहे. ग्लोबल स्टँडर्ड्सशी तुलना केल्यास, हे रॉकेट अत्यंत उत्तम असल्याचं लक्षात येतं; असं मत इस्रोचे माजी प्रमुख जी. माधवन नायर यांनी व्यक्त केलं.

Xposat Mission : इस्रो प्रमुखांनी घेतलं परमेश्वरी देवीचं दर्शन

इस्रोच्या नव्या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर एस. सोमनाथ यांनी रविवारी रात्री श्री चेंगलम्मा परमेश्वरी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. आंध्र प्रदेशातील सुल्लूरपेटा येथे हे मंदिर आहे.

ISRO New Mission : प्रक्षेपणाची तयारी पूर्ण

आज सकाळी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येईल. यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. थोड्याच वेळात हे प्रक्षेपण पार पडेल.

ISRO XPoSat Mission : एक्सपोसॅट मोहीम

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रोने एक महत्वाकांक्षी मोहीम राबवली. आज सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी एक्सपोसॅट या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आलं. अंतराळातील कृष्णविवरे आणि अशा अनेक प्रकाशस्त्रोतांचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. अशा प्रकारची ही भारताची पहिली आणि जगातील दुसरीच मोहीम आहे. हे प्रक्षेपण तुम्ही येथे लाईव्ह पाहू शकता..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *