विज्ञान तंत्रज्ञान

Lookback 2023 : भारतीयांनी यावर्षी यूट्यूबवर कशाला दिली पसंती? सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या टॉप 10 व्हिडिओंची यादी समोर

विशेष म्हणजे या यादीमध्ये पहिल्या पाचपैकी चार व्हिडिओ हे विनोदी कंटेंट असलेले आहेत.

Top 10 Watched YouTube Videos in 2023 : जगातील सर्वात मोठं व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असणाऱ्या यूट्यूबचे जगभरात अब्जावधी यूजर्स आहेत. एका मिनिटात या प्लॅटफॉर्मवर तब्बल 500 हून अधिक तासांचे व्हिडिओ अपलोड होतात. यातील काही व्हिडिओंना मोठ्या प्रमाणात पाहिलं गेलं. भारतीयांनी 2023 मध्ये कोणत्या व्हिडिओंना सर्वाधिक पसंती दर्शवली याची एक यादी आता प्रसिद्ध करण्यात आली आहे.

चांद्रयान-3

भारतीयांनी यावर्षी सर्वाधिक पाहिलेला व्हिडिओ म्हणजे चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगचं इस्रोने केलेलं लाईव्ह स्ट्रीमिंग. या स्ट्रीमला 8.06 मिलियन लोकांनी लाईव्ह पाहिलं. तर आतापर्यंत यावर 79 मिलियनहून अधिक व्ह्यूज आले आहेत.

कॉमेडी व्हिडिओंनी मारली बाजी

यानंतर दुसऱ्या क्रमांकावर राउंड टू हेल नावाच्या चॅनलने अपलोड केलेला ‘Men on Mission’ हा व्हिडिओ आहे. विनोदी व्हिडिओंसाठी हे चॅनल प्रसिद्ध आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर स्टँडअप कॉमेडियन अनुभव सिंग बस्सीचा UPSC हा व्हिडिओ आहे. चौथ्या क्रमांकावर Carryminati चा Daily Vloggers Parody हा व्हिडिओ आहे. तर कॉमेडियन आशिष चंचलानीचा Satsa Big Boss हा पॅरोडी व्हिडिओ पाचव्या क्रमांकावर राहिला.

सहाव्या क्रमांकावर Harsh Beniwal चा चेकमेट हा व्हिडिओ आहे. दि व्हायरल फीव्हरच्या ‘संदीप भैय्या’ वेब सीरीजचा पहिला भाग सातव्या क्रमांकावर राहिला. टेक्नो गेमर्सचा I Stole Supra from Mafia हा व्हिडिओ आठव्या क्रमांकावर होता. GTA 5 गेमचा हा गेमप्ले आहे. BB Ki Vines चॅनलचा अँग्री मास्टरजी पार्ट 16 हा व्हिडिओ नवव्या क्रमांकावर होता. तर स्ँटडअप कॉमेडियन अभिषेक उपमन्यूचा Health Anxity हा व्हिडिओ दहाव्या क्रमांकावर राहिला.

लाईव्ह स्ट्रीममध्ये चांद्रयानाचा विक्रम

‘चांद्रयान-3’च्या लाईव्ह स्ट्रीमने एक अनोखा रेकॉर्डही केला. यावर्षी जगात सर्वात जास्त पाहिलं गेलेलं हे स्ट्रीम ठरलं. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर Brazil Vs South Korea हा सामना होता, ज्याला 6.15 मिलियन लोकांनी पाहिलं. तिसऱ्या क्रमांकावर Brazil Vs Croatia (5.2 मिलियन), चौथ्या क्रमांकावर Vasco vs Flamengo (4.8 मिलियन) आणि पाचव्या क्रमांकावर SpaceX Crew Demo (4.08 मिलियन) हा व्हिडिओ होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *