विज्ञान तंत्रज्ञान

Realme GT5 Pro : टच करण्याचीही गरज नाही, केवळ हाताच्या इशाऱ्यांनी वापरता येणार हा स्मार्टफोन; भारतात कधी येणार?

Realme GT5 Pro Hand Gestures : रिअलमी ब्रँडने आपला लेटेस्ट स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. Realme GT5 Pro असं नाव असलेल्या या स्मार्टफोनमध्ये कित्येक अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यासोबतच या फोनमध्ये सध्याचा सर्वात लेटेस्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन जेन 3 चिपसेट देण्यात आला आहे.

जेस्चर कंट्रोल

या स्मार्टफोनमध्ये कंपनीने तब्बल 12 जेस्चर कंट्रोल फीचर्स दिले आहेत. केवळ फोनचा यूजर इंटरफेसच नाही, तर काही सोशल मीडिया अ‍ॅप्सना देखील हे जेस्चर सपोर्ट करतील. टिपस्टर अभिषेक यादव यांनी याबाबतचा एक व्हिडिओ आपल्या एक्स हँडलवरुन शेअर केला आहे. फोनमधील जेस्चर कशा प्रकारे काम करतात हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

हा फोन भारतात कधी लाँच होणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, पुढील वर्षी कंपनी भारतात हा फोन लाँच करू शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

फीचर्स

Realme GT5 Pro स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच मोठा कर्व्ह्ड OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 144Hz एवढा आहे. तसंच याची पीक ब्राईटनेस 4.500 निट्स आहे. यामध्ये 5,400 mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 100W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. सोबतच या फोनमध्ये 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट दिलं आहे.

कॅमेरा

या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील प्रायमरी कॅमेरा 50 MP क्षमतेचा आहे. यामध्ये सोनीचा सेन्सर देण्यात आला आहे. यातील सेकंडरी कॅमेरा देखील 50MP आहे. यामध्ये OIS आणि EIS सपोर्ट मिळतो. सोबतच 3x झूम देण्यात आलं आहे. अल्ट्रा वाईड अँगलसाठी यात 8MP कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेरा 32MP आहे.

किंमत

हा फोन चीनमध्ये लाँच झाला आहे. याच्या 12GB+256GB व्हेरियंटची किंमत 3,399 युआन (सुमारे 39,900 रुपये) एवढी आहे. तर 16GB+512GB व्हेरियंटची किंमत 3,999 युआन (सुमारे 46,900 रुपये) एवढी आहे. यासोबत या फोनच्या 16GB+1TB व्हेरियंटची किंमत 4,299 युआन (सुमारे 50,400 रुपये) आहे. हा फोन तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *