Smartphones Under 7K : तुम्हाला जर नवा स्मार्टफोन घ्यायचा असेल, आणि तुमचं बजेट सात हजारांपेक्षा कमी असेल; तर बाजारात सध्या कितीतरी चांगले पर्याय उपलब्ध आहेत. यातीलच सध्याचे टॉप तीन पर्याय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
itel A70
काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या itel A70 या फोनची 5 जानेवारीपासून विक्री सुरू झाली आहे. हा फोन अमेझॉनवरुन खरेदी करता येईल. याला लाँच ऑफरमध्ये 800 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तीन वेगवेगळ्या स्टोरेज व्हेरियंटमध्ये हा उपलब्ध करण्यात आलेला आहे.
यामध्ये 6.6 इंच मोठी एलसीडी स्क्रीन दिली आहे, जिचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. यात uniSoC T603 चिपसेट असणारा प्रोसेसर आहे. यात अँड्रॉईड 13 (गो) आधारित itelOS 13 ही ऑपरेटिंग सिस्टीम दिली आहे.
या फोनमध्ये 13MP एआय रिअर कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. तसंच यात 5000 mAh क्षमतेची तगडी बॅटरी दिली आहे. itel A70 4GB+64GB व्हेरियंटची किंमत 6,299 रुपये आहे. 4GB+128GB व्हेरियंटची किंमत 6,799 रुपये आहे, तर 4GB+256GB व्हेरियंटची किंमत 7,299 रुपये आहे.
टेक्नो स्पार्क
Tecno Spark Go 2024 हादेखील बजेट फोनसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. यामध्ये तब्बल 90Hz रिफ्रेश रेट असणारा 6.56 इंच मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच यामध्ये 13MP क्षमतेचा एआय कॅमेरा दिला आहे. यात 5,000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
या फोनचे दोन व्हेरियंट उपलब्ध आहेत. 3GB+64GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 6,699 रुपये आहे. तर 4GB+64GB व्हेरियंटची किंमत 6,999 रुपये आहे.
इनफिनिक्स
या यादीमधील तिसरा स्मार्टफोन Infinix Smart 8 HD हा आहे. यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट असणारा 6.6 इंच मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. वरील दोन्ही स्मार्टफोनप्रमाणे यातही 13MP एआय कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. तसंच यामध्येही 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. याच्या 3GB+64GB व्हेरियंटची किंमत 6,299 रुपये आहे.