फोन चोरीला गेल्यास आपला युपीआय आयडी कसा ब्लॉक कराल? जाणून घ्या
आजकाल मोबाईलशिवाय कोणतेही काम होत नाही. त्यामुळे मोबाइल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास अनेकदा मोबाइलच्या किमतीपेक्षा त्यात साठवलेला डेटा हरवण्याची किंवा त्याचा गैरवापर होण्याची भीती असते.
अनेकदा सायबर फसवणुकीत वापरकर्त्यांच्या डेटाशी छेडछाड केली जाते. अशा परिस्थितीत मोबाईल बँकिंगचा डेटा लीक होण्याची किंवा फसवणूक होण्याची भीती असते. सरकारची डिजिटल इंडिया योजना देशातील जवळपास सर्व घरांपर्यंत पोहोचली आहे. ते वापरताना सुरक्षित कसे ठेवता येईल, या गोष्टीही लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
तुमचा फोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, तुम्ही तुमचा Google Pay, Phone Pay, Paytm आणि UPI आयडी त्वरित ब्लॉक करावा. हे तुमच्या बँक खात्याचे कोणत्याही अनऑथराइज्ड व्यवहारांपासून संरक्षण करण्यात मदत करेल. आज आम्ही तुमचा UPI आयडी कसा ब्लॉक करायचा हे सांगणार आहोत.
तुमच्या बँकेला सूचित करा:
सर्वप्रथम, तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेल्याची माहिती तुम्ही ताबडतोब तुमच्या बँकेला द्यावी. तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करून किंवा बँकेच्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन रिपोर्ट दाखल करून हे करू शकता.
तुमचा UPI पिन बदला:
तुम्ही तुमच्या UPI अॅपसाठी पिन सेट केल्याचे तुम्हाला आठवत असल्यास, तुम्ही तो ताबडतोब बदलला पाहिजे. तुम्ही तुमच्या बँकेच्या वेबसाइट किंवा अॅपद्वारे तुमचा पिन बदलू शकता.
तुमचा मोबाईल नंबर ब्लॉक करा:
जर तुमचे बँक अकाउंट तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर ब्लॉक करावा. हे तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधून केले जाऊ शकते.
सायबर क्राईमची तक्रार दाखल करा:
तुमचा UPI आयडी फसवणुकीसाठी वापरला गेल्याचा तुम्हाला संशय असल्यास, तुम्ही तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला भेट देऊन किंवा ऑनलाइन सायबर क्राईम पोर्टलद्वारे तक्रार नोंदवू शकता.
Google Pay UPI आयडी असा करा ब्लॉक
Android वापरकर्त्यांसाठी:
- तुमच्या फोनवरून 18004190157 हा नंबर डायल करा.
- Google Pay अकाउंट ब्लॉक करण्याबद्दल कस्टमर केयरला कळवा.
- PC किंवा फोनवर Google Find My Phone वर लॉगिन करा.
- सर्व Google Pay डेटा रिमोटली डिलीट करा.
iOS वापरकर्त्यांसाठी:
- तुमच्या फोनवरून 18004190157 हा नंबर डायल करा.
- Google Pay खाते ब्लॉक करण्याबद्दल कस्टमर केयरला कळवा.
- Find my app आणि इतर Apple अथॉराइज्ड टूल्सद्वारे सर्व डेटा डिलीट करून Google Pay अकाउंट ब्लॉक करा.
फोन पे UPI आयडी असा करा ब्लॉक
- तुम्हाला PhonePe कस्टमर केअरशी संपर्क साधावा लागेल.
- तुम्ही 02268727374 किंवा 08068727374 या क्रमांकावर कॉल करू शकता.
- यानंतर कस्टमर केअर तुम्हाला आयडी ब्लॉक करण्यात मदत करू शकते.