Weather App News: पुण्यातील एका १३ वर्षीय विद्यार्थ्याने हवामान ॲप तयार केले आहे. देशातील कोणत्याही गाव आणि शहराचे हवामान या ॲपमध्ये तपासता येणार आहे. राज्यात सतत बदलत असलेल्या हवामानामुळे तसेच, वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, सरकारकडून यावर अनेक उपाययोजना केल्या जातात मात्र परिस्थिती बदलत नाही. सुप्रीम कोर्टाने देखील वाढत्या प्रदुषणावर चिता व्यक्त केली आहे.
दरम्यान पुणे येथील द अकॅडमी स्कूल (TAS) चा १३ वर्षीय विद्यार्थी पलाश वाघ याने हवामान ॲप तयार केले आहे. हा विद्यार्थी इयत्ता आठवी मध्ये शिकत आहे. पलाश याने हवामानाचा अंदाज घेणारा ॲप तयार केला आहे. यामुळे पलाशचे कौतुक होत आहे.
विद्यार्थी पलाश वाघ म्हणाला, “इतरांपेक्षा मला काहीतरी वेगळं करायचं आहे. माझे आवडते विषय भूगोल आणि संगणक आहे. या दोन विषयांचा आधार घेऊन मी कोडिंग करण्याचा प्रयत्न केला. हे ॲप जावा स्क्रिप्ट आणि एचटीएमएल वापरून तयार केले आहे. वापरकर्ता इंटरफेस सीएसएसने केला आहे. हे ॲप ॲपप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) नावाच्या सॉफ्टवेअरशी जोडले गेले आहे. जे उपकरणाच्या स्थानानुसार रिअल-टाइम हवामान दर्शवण्यास मदत करते. हे ॲप परिसरातील वाऱ्याचा वेग आणि आर्द्रता देखील दर्शवते.”
दरम्यान पुणे येथील द अकॅडमी स्कूल (TAS) चा १३ वर्षीय विद्यार्थी पलाश वाघ याने हवामान ॲप तयार केले आहे. हा विद्यार्थी इयत्ता आठवी मध्ये शिकत आहे. पलाश याने हवामानाचा अंदाज घेणारा ॲप तयार केला आहे. यामुळे पलाशचे कौतुक होत आहे. (Pune News)