ICC Awards : रचिन रविंद्रची आयसीसी पुरूष इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्याने 2023 मध्ये अष्टपैलू म्हणून दमदार कामगिरी केली. त्याने वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये देखील न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने या वर्षात 34.44 च्या सरासरीने 911 धावा केल्या आहेत तर 23 विकेट्स घेतल्या आहेत.
रचिन रविंद्रने 2023 मध्ये 41 वनडे सामन्यात 820 धावा केल्या होत्या. त्याने या धावा 108.03 च्या स्ट्राईक रेटने केल्या. तर 46.61 ची सरासरी आणि 6.02 च्या इकॉनॉमीने 18 विकेट्स घेतल्या.
रचिनने टी 20 क्रिकेटमध्ये 133.82 च्या स्ट्राईक रेटने 91 धावा केल्या असून त्याने 32.80 ची सरासरी आणि 9.11 च्या इकॉनॉमी रेटने 5 विकेट्स घेतल्या आहेत.
आयसीसी इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार पटकावल्यानंतर न्यूझीलंडचा रचिन रविंद्र म्हणाला की, ‘नक्कीच ही खूप खास भावना आहे. आयसीसीकडून तुमची स्तुती होणं ही नेहमीच खास बाब असते.’
‘गेल्या वर्षीच्या कामगिरीकडे मागे वळून पाहताना ते वर्ष खूप वादळी होतं असं म्हणता येईल. मला वेगवेगळ्या वातावरणात खूप क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली ही गोष्ट विशेषच आहे.’
रचिन रविंद्रसोबत भारताचा टी 20 स्पेशलिस्ट सूर्यकुमार यादवला देखील आयसीसी T20 प्लेअर ऑफ इयरच्या पुरस्कार मिळाला. त्याने गेल्या वर्षी 17 डावात 733 धावा केल्या आहेत. त्याने या धावा 48.86 च्या सरासरीने आणि 155.95 च्या स्ट्राईक रेटने केल्या.