शेयर बाजार

Multibagger Stocks: 8 हजारांचे झाले एक कोटी, ‘या’ कंपनीने 9 महिन्यात दिला 191 टक्के परतावा

Multibagger Stocks: सध्या कंपनीचा शेअर 710 रुपयांवर ट्रेड करत आहे.

Multibagger Stocks: शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना अतिशय कमी काळात चांगला परतावा देऊन श्रीमंत केले आहे. असाच शेअर आहे पिट्टी इंजिनीअरिंगचा(Pitti Engineering). या शेअरने केवळ 8 हजारांच्या गुंतवणुकीवर आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

एवढेच नाही तर केवळ 9 महिन्यांत 191 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. सध्या या शेअरमध्ये काहीशी घसरण झाली आहे, पण ब्रोकरेज फर्म ऍक्सिस सिक्युरिटीजने ही गुंतवणुकीची सुवर्णसंधी असल्याचे म्हटले आहे.

सध्या हा शेअर 710 रुपयांवर ट्रेड करत आहे. पिट्टी इंजिनिअरिंग ही इलेक्ट्रिकल लॅमिनेशन, मोटर कोअर, सब-असेंबली, डाय-कास्ट रोटर्स आणि प्रेस टूल्सची देशातील सर्वात मोठी उत्पादक आहे.

3 जून 2003 रोजी पिट्टी इंजिनिअरिंगचे शेअर्स केवळ 57 पैशांना मिळत होते. आता तो 710 रुपयांवर आहे, म्हणजेच सुमारे 8 हजार गुंतवून 20 वर्षांत गुंतवणूकदार कोट्यधीश झाले. तर 16 मार्च 2023 रोजी हा शेअर 256.80 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होता.

यानंतर, अवघ्या 9 महिन्यांत 191 टक्क्यांहून अधिक वाढीसह 5 डिसेंबर 2023 रोजी 748 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर गेला. प्रॉफिट बुकींगमुळे त्यात सध्या घसरण झाली आहे.

कंपनीचा महसूल आर्थिक वर्ष 2026 पर्यंत 13 टक्क्यांच्या सीएजीआरने वाढून 1588 कोटी होईल आणि एबिटदाही आर्थिक वर्ष 2026 पर्यंत 13 टक्क्यांच्या सीएजीआरने वाढून 258 कोटी होईल.

त्याचे ऑपरेशनल मार्जिनही 2.40 टक्क्यांनी 16.2 टक्क्यांनी सुधारेल असे कंपनीचे म्हणणे आहे. या सर्व कारणांमुळे, ब्रोकरेजने त्याला 915 रुपयांच्या टारगेटसह खरेदी रेटिंग दिले आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *