शेयर बाजार

Share Market Opening: 3 दिवसांच्या प्रॉफिट बुकींगला ब्रेक; सेन्सेक्समध्ये 600 अंकांची उसळी, कोणते शेअर्स तेजीत?

Share Market Opening Latest Update 19 January 2024: शुक्रवारी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. चांगल्या जागतिक संकेतांमुळे प्रमुख निर्देशांक तेजीसह उघडले. सेन्सेक्स 630 अंकांनी वाढून 71,800च्या वर व्यवहार करत आहेत. निफ्टीही 190 अंकांनी वाढून 21,650च्या जवळ पोहोचला आहे.

बाजारात सर्वाधिक खरेदी आयटी, वित्तीय आणि मेटल क्षेत्रात होत आहे. टेक महिंद्रा निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले आहेत. तर निकालानंतर इंडसइंड बँकेचे शेअर्स घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आज निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकात वाढ झाली. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात सन फार्मा, सिप्ला, टेक महिंद्रा आणि टाटा मोटर्सचे शेअर्स वधारत होते, तर एलटीआय माइंडट्री, एचडीएफसी बँक, एनटीपीसी आणि टायटनचे शेअर्सही वधारत होते.

आज गिफ्ट निफ्टी तेजीसह उघडला. रिलायन्स, एचयूएल आणि अल्ट्राटेक सारखे निफ्टीमध्ये हेवीवेट असलेले शेअर्स आज त्यांचे निकाल जाहीर करणार आहेत. शेअर बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जागतिक अनिश्चिततेच्या या वातावरणात शेअर बाजारात मर्यादित वाढ दिसून येऊ शकते.

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणार्‍या कंपन्यांमध्ये अदानी समूहाच्या सर्व 10 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. अदानी टोटल गॅस 1.40 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होते तर अदानी एनर्जी सोल्यूशनचे शेअर्स किंचित वाढीसह व्यवहार करत होते.

जागतिक बाजार सावरले

गुरुवारच्या व्यवहारात अमेरिकन बाजारातही चांगली रिकव्हरी दिसून आली. वॉल स्ट्रीटवरील डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज 200 हून अधिक अंकांनी वाढला. S&P 500 मध्ये 42 अंकांची रिकव्हरी दिसून आली.

आशियाई बाजारात मोठी वाढ

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आशियाई बाजारात वाढ दिसत आहेत. जपानचा निक्केई सुरुवातीच्या सत्रात 1.4 टक्क्यांच्या तेजीसह व्यवहार करत होता. दक्षिण कोरियाच्या कोस्पीमध्ये 1.15 टक्के आणि कोस्डॅकमध्ये 1.37 टक्के वाढ दिसून आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *