शेयर बाजार

Share Market Opening Bell : शेअर बाजाराची धमाकेदार सुरूवात, सेन्सेक्स 70 हजारांवर उघडला; निफ्टीनेही केला रेकॉर्ड

Share Market All time High : भारतीय शेअर मार्केटची आज (14 डिसेंबर) धमाकेदार सुरूवात झाली आहे. मार्केट सुरू होताना BSE सेन्सेक्स 561.49 अंकांनी वर जाऊन 70,146 अंकावर उघडला. हा आतापर्यंतचा सर्वात उच्च रेकॉर्ड आहे. दुसरीकडे निफ्टीदेखील 184.05 अंकांनी वर जाऊन 21,110.40 अंकांवर उघडला.

आज बाजारात सगळीकडे ग्रीन मार्क दिसत आहे. सेन्सेक्स, निफ्टी, बँकनिफ्टी आणि मिडकॅप इंडेक्स देखील तेजीत व्यवहार करत आहेत.

अमेरिकी फेडरल रिझर्व्हचे व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला. यानंतर अमेरिकेच्या शेअर मार्केटमध्ये तेजी दिसली. याचाच परिणाम भारतीय शेअर मार्केटवरही दिसून आला. यामुळेच आज सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही विक्रमी आकड्यांवर उघडले.

बँकनिफ्टी

शेअर मार्केट उघडल्यानंतर Bank Nifty 626.30 अंकांच्या तेजीसह 47,718 अंकांवर पोहोचली होती. बँकनिफ्टीमधील सर्व 12 शेअर्स तेजीमध्ये व्यवहार करत होते. यात बंधन बँक टॉप गेनर्स यादीमध्ये सर्वात वर आहे.

निफ्टी

मार्केट उघडताना निफ्टीमधील 50 पैकी 50 शेअर्स तेजीमध्ये व्यवहार करत होते. यातील टॉप गेनर्समध्ये एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा हे होते. इन्फोसिस आणि विप्रोमध्येही भरपूर वाढ दिसली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *