शेयर बाजार

Share Market Opening: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्स 71,300 च्या खाली, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?

Share Market Opening: सेन्सेक्स 250 अंकांनी घसरला

Share Market Opening Latest Update 18 December 2023: शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर आज (सोमवारी) प्रॉफिट बुकींग दिसून आले. प्रमुख बाजार निर्देशांकांची सुरुवात घसरणीने झाली. BSE सेन्सेक्स सुमारे 250 अंकांनी घसरला आणि 71,250 च्या पातळीवर पोहोचला. निफ्टीही 21400 च्या खाली घसरला आहे.

सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकात घसरण झाली. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात वाढ दर्शविलेल्या शेअर्समध्ये आयशर मोटर्स, यूपीएल, बजाज ऑटो आणि नेस्ले इंडियाच्या शेअर्सचा समावेश होता, तर घसरण झालेल्या शेअर्समध्ये जेएसडब्ल्यू स्टील, आयटीसी, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिसच्या शेअर्सचा समावेश होता.

आज सुरुवातीच्या व्यापारात मल्टीबॅगर शेअर्समध्ये ओम इन्फ्रा, ब्रँड कॉन्सेप्ट, कामधेनू लिमिटेड, युनी पार्ट्स इंडिया, स्टोव्ह क्राफ्ट, जिओ फायनान्शियल आणि देवयानी इंटरनॅशनल यांचे शेअर्स वधारले तर टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, एक्साइड इंडस्ट्रीज, पटेल इंजिनीअरिंगचे शेअर्स किंचित घसरले आहेत.

आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी अदानी समूहाच्या नऊ कंपन्यांपैकी तीन कंपन्यांचे शेअर्स किरकोळ वाढले तर सहा शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते. अंबुजा सिमेंट, एसीसी लिमिटेडच्या शेअर्समध्ये किंचित वाढ नोंदवण्यात आली.

सोमवारी, सेंट्रल बँक ऑफ जपानच्या चलनविषयक धोरणांशी संबंधित पावलांमुळे आशियाई शेअर बाजारात घसरण नोंदवली जात आहे. सोमवारी, GIFT निफ्टी 65 अंकांच्या घसरणीसह 21485 अंकांच्या पातळीवर होता.

अमेरिकेचे 10 वर्षांचे रोखे उत्पन्न अजूनही 4% च्या खाली आहे. या आठवड्यात अमेरिकेत काही महत्त्वाचा डेटा प्रसिद्ध होणार आहे. या वर्षीचे महागाईचे शेवटचे आकडे प्रसिद्ध होणार आहेत. याशिवाय बेरोजगारीची आकडेवारीही येईल. अमेरिकेच्या जीडीपीवरील अंदाज देखील जाहीर केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *