शेयर बाजार

Share Market Opening: शेअर बाजारात निवडणुकीचा जल्लोष; निफ्टी पहिल्यांदाच 20500 च्या पुढे; अदानी शेअर्समध्ये मोठी वाढ

शेअर मार्केट ओपनिंग लेटेस्ट अपडेट 4 डिसेंबर 2023: शेअर मार्केटमध्ये आज सोमवारी जोरदार खरेदी दिसून आली. कारण जीएसटी संकलन, जीडीपी वाढीचे आकडे आणि विधानसभा निवडणुकीतील भाजपचा नेत्रदीपक विजय याचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. GIFT निफ्टी 20600 च्या वर ट्रेड करत आहे.

शेअर बाजार आज विक्रमी पातळीवर उघडला. BSE सेन्सेक्स जवळपास 900 अंकांनी 68,435 वर उघडला आणि निफ्टी पहिल्यांदा 20,601 वर उघडला. बाजाराला देशांतर्गत आणि जागतिक संकेतांचा पाठिंबा मिळत आहे.

भाजपच्या विजयामुळे शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. निफ्टीमध्ये अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स वाढले आहेत.

निफ्टीचा नवा विक्रम

प्री-ओपन सत्रात जोरदार वाढ झाल्यानंतर, भारतीय शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक निफ्टी सकाळी 9.15 वाजता नवीन विक्रमी उच्चांकावर उघडला. निफ्टी 276.40 अंकांच्या किंवा 1.36 टक्क्यांच्या वाढीसह 20,600 च्या पातळीवर उघडला.

निफ्टीवरील अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, एसबीआय आणि एल अँड टी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ दिसून आली.

सेन्सेक्स गेला 68000 च्या वर

दुसरीकडे बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 882.38 अंक किंवा 1.31 टक्क्यांच्या उसळीसह 68,363.57 च्या पातळीवर उघडला. बाजार उघडताच जवळपास 2194 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 259 शेअर्स घसरणीसह उघडले, तर 119 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.

विदेशी गुंतवणूकदारांची खरेदी वाढल्याने शेअर बाजारात सकारात्मक वातावरण आहे. गेल्या आठवड्यात विदेशी गुंतवणूकदारांनी 10593 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. तसेच, जीएसटीमधून केंद्र सरकारचे उत्पन्न 15 टक्क्यांनी वाढले आहे, तर तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशामुळे शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. अमेरिकेतील महागाईचे आकडे घसरले आहेत. नवीन वर्षात अमेरिकेतील व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे. एनटीपीसी, लार्सन अँड टुब्रो, अॅक्सिस बँक आणि आयटीसीचे समभाग सुरुवातीच्या व्यवहारात उच्च पातळीवर व्यवहार करत होते. आज सुरुवातीच्या व्यवहारात गौतम अदानी समूहाच्या सर्व नऊ कंपन्यांचे समभाग वधारले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *