शेयर बाजार

Share Market Today: शेअर बाजारातील घसरणीच्या सत्रात कोणते शेअर्स मिळवून देतील नफा?

Share Market Investment Tips: बुधवारी बाजारात गेल्या दीड वर्षांतील सर्वात मोठी एकदिवसीय घसरण पाहायला मिळाली. या घसरणीत निफ्टी 21,600 च्या खाली आला आहे. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 1,628.01 अंकांनी अर्थात 2.23 टक्क्यांनी घसरून 71,500.76 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 460.30 अंकांनी म्हणजेच 2.09 टक्क्यांनी घसरून 21,572 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बेअर्सने पूर्ण ताकदीने हल्ला केला आणि बुधवारच्या व्यवहारावर वर्चस्व गाजवल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर यांनी सांगितले. व्यवहाराच्या शेवटी निफ्टी 460.35 अंकांच्या घसरणीसह 21,571.95 वर बंद झाला. ब्रॉडर मार्केटमध्येही करेक्शन दिसून आले पण मिड आणि स्मॉलकॅप्सने आघाडीच्या इंडेक्सना मागे टाकले.

बँकिंग शेअर्सना सर्वाधिक फटका बसला. बँक निफ्टीमध्ये हेड अँड शोल्डर फॉर्मेशनपासून ब्रेकडाउन दिसून आले आहे. या पॅटर्ननुसार बँक निफ्टीचे डाउनसाइड टार्गेट 45,500 वर येते. ही मोठी घसरण लक्षात घेता, बाजारात दिलासादायक तेजी अपेक्षित आहे, पण बाजार वरच्या पातळीवर टिकेल का हे पाहणे बाकी आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • एचडीएफसी बँक (HDFCBANK)
  • टाटा स्टील (TATASTEEL)
  • कोटक बँक (KOTAKBANK)
  • ऍक्सिस बँक (AXISBANK)
  • हिन्दाल्को (HINDALCO)
  • भारतीय कंटेनर निगम लिमिटेड (CONCOR)
  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)
  • एचडीएफसी ऍसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (HDFCAMC)
  • ए यू बँक (AUBANK)
  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

नोंद – क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *