शेअर बाजाराने तब्बल ६ दिवसांनंतर शुक्रवारी उसळी घेतली. आज दिवसभराच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्सची ६३४.६५ अंकानी वाढ झाली. त्यामुळे सेन्सेक्स ६३७८२.८० वर बंद झाला. तर निफ्टी १९० अंकानी वाढल्यानंतर १९,०४७.२५ वर बंद झाला. शेअर बाजाराने सहाव्या दिवसानंतर उसळी घेतल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय.
मीडिया वृत्तानुसार, आज शुक्रवारी BSEच्या सर्व सेक्टरमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदी केली. अॅक्सिस बँक, कोल इंडिया, एचसीएल टेक्नोलॉजीज, एसबीआय आणि अदानी इन्टरप्राइजेज या कंपन्या टॉप गेनर आहेत.
तर डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, यूपीएल, टाटा स्टील आणि एशियन पेन्ट्स मॅड्रिड कंपन्यांचे शेअर्स टॉप लूजर राहिले. सरकारी बँकांचे शेअर, ऑटो, फायन्शिअल सेक्टर, मीडिया, आयटी आणि रियल्टी क्षेत्रात तेजी पाहायला मिळाली.
काल कोणत्या कंपनीचे शेअर कोसळले?
BSE चे बेन्चमार्क सेन्सेक्स गेल्या सत्रात म्हणजे गुरवारी ९००.९१ अंकांनी म्हणजेच १.४१ टक्क्यांनी घसरला. त्यामुळे सेन्सेक्स ६३,१४८.१५ वर बंद झाला. तर एनएसई निफ्टी २६४.९० अंकांनी म्हणजे १.३९ टक्क्यांनी घसरून १८,८५७.२५ वर बंद झाला.
बजाज फायनान्स, एशियन पेन्ट्स, टायटन जेएसडब्लू स्टील, टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक, कोटक बँक,मारुती, एलटी,एसबीआय, टीसीएस, सन फार्मा, रिलायन्स, भारती एअरटेल,टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, नेस्ले इंडिया, टाटा मोटर्स, विप्रो, इन्फोसिस,आयसीआयसीआय बँक, अल्ट्रा केमिकल, पॉवर गिल्ड, एचयूएल या कंपनींच्या शेअरमध्ये काल घसरण पाहायला मिळाली.